अहमदाबाद: भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा सात विकेटनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. तेव्हा इंग्लंडच्या माजी कर्णधाराने टीम इंडियाची तुलना आयपीएलमधील संघाशी केली होती. आता विजयानतंर देखील पुन्हा एकदा अशीच खोचक टीका केली आहे. वाचा- रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारतीय संघाची तुलना पुन्हा एकदा या आयपीएलमधील संघाशी केली आहे. वाचा- वॉनने ट्विटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मुंबई इंडियन्स आज इंग्लंडविरुद्ध खुप चांगली खेळली, असे म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्याने मुंबई इंडियन्सला टॅग केले असून सोबत #INDvENGt20 असा हॅशटॅग देखील वापरला आहे. वाचा- वाचा- दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले होते. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान देण्यात आले. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. दोघांची ही पदार्पणाची मॅच होती. पहिल्याच सामन्यात इशान किशनने सलामीला येत अर्धशतक झळकावले. त्याने ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. कर्णधार विराट सोबत केलेल्या ९४ धावांच्या भागिदारीमुळे भारताचा विजय सोप झाला. वाचा- भारतीय संघाचा उल्लेख मुंबई इंडियन्स असा करण्याची मायकल वॉनची ही पहिली वेळ नाही. याआधी जेव्हा भारतीय संघाने पहिला टी-२० सामना गमावला होता. तेव्हा वॉनने यापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ चांगला, असे म्हटले होते. त्याच्या या ट्वीटवर भारताच्या वासीम जाफरने इंग्लंडच्या संघात चार विदेशी खेळाडू असल्याची जाणीव करून दिली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OvwmGd
No comments:
Post a Comment