नवी दिल्ली: क्रिकेट संघात फक्त ११ खेळाडू मैदानावर खेळू शकतात. कसोटी, वनडे अथवा टी-२० या तिनही प्रकारात चार खेळाडूांना बेंचवर बसावे लागते. सर्वसाधारणपणे संघात सहा ते आठ खेळाडू असे असतात जे कायम असतात. कोणत्याही संघ व्यवस्थापन अथवा निवड समितीसाठी ही गोष्टी कधीही चांगली ठरेत जेव्हा त्यांच्याकडे निवडण्यासाठी अनेक पर्याय असतात. संघातील स्पर्धेसाठी आणि संघ अधिक मजबूत करण्यासाठी ही गोष्ट चांगली ठरते. भारतीय संघ व्यवस्थापनासाठी आता ही गोष्ट डोकेदुखी ठरू शकते. वाचा- इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी संघात कोणत्या खेळाडूंना जागा द्यायची असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. विकेटकिपरचा विचार केल्यास ऋषभ पंत सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याच बरोबर इशान किशन देखील संघात स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचलाय. संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले नसले तरी तो चांगली कामगिरी करून पुन्हा दावेदारी सिद्ध करू शकतो. फक्त हे तीन खेळाडू नाही तर दिनेश कार्तिक आणि वृद्धिमान साहा, एस भगत आणि एन जगदीशन हे देखील या एका जागेचे दावेदार आहेत. पंतने इतकी चांगली कामगिरी केल्यानंतर देखील स्पर्धा अधिक आहे. वाचा- भारताची आताची अडचण हीच आहे की त्यांना अधिक खेळाडूंमधून निवड करायची आहे. भारतीय संघाचे मुख्य कोच यांच्या मते ही एक चांगली डोकेदुखी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जेव्हा रविंद्र जडेजाला दुखापत झाली. तेव्हा त्याच्या जागी इंग्लंड दौऱ्यात अक्षर पटेलला संधी मिळाली. आता अक्षरने अशी काही कामगिरी केली आहे की त्याला संघातून वगळणे शक्य नाही. वाचा- जसप्रीत बुमराहने लग्नासाठी ब्रेक घेतला आहे. तो लवकरच संघात परतेल. मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार देखील कामगिरीसाठी सज्ज झालेत. उमेश यादव १५ जणांच्यात स्थान मिळवेल. पण अंतिम ११ मध्ये त्याला जागा मिळणार नाही. नवदीप सैनी, टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांनी देखील अपेक्षा वाढवल्या आहेत. सर्व साधारणपणे आम्ही १७ ते १८ खेळाडूंसह प्रवास करतो. पण यावेळी ऑस्ट्रेलियात जैव वातावरणात रहावे लागल्याने २५-३० खेळाडूंसह प्रवास केला. त्यामुळे सर्वोत्तम संघ निवडताना खुप मेहनत करावी लागली. ऑस्ट्रेलियात गोष्टी अशा घडल्या की सर्व ३० खेळाडूंना खेळावे लागले. यामुळे कोणत्या खेळाडूची कशी कामगिरी आहे हे कळाले. संघात टी नटराजन आणि सुंदर यांना देखील संधी मिळाली. वाचा- भविष्यात अशी वेळ येऊ शकते की भारतीय संघाचे दोन संघ मैदानावर उतरतील, असे रवी शास्त्री म्हणाले. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पुढील १९ जणांमधून अंतिम संघ निवडायचा आहे. भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया,टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bwKiZ2
No comments:
Post a Comment