नवी दिल्ली: जगातील महान फलंदाज ( ) आणि त्याचे चाहते यांच्यासाठी १६ मार्च हा दिवस खास असा आहे. आजच्या दिवशी ९ वर्षांपूर्वी सचिनने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली होती. हा विक्रम मोडणे कोणत्याही क्रिकेटपटूला मोडणे अवघड आहे. वाचा- सचिनने १६ मार्च २०१२ रोजी मीरपूर येथे झालेल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय करिअरमधील शतकांचे शतक झळकावले होते. बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात सचिनने हा विक्रम केला होता. वाचा- आशिया कप २०१२च्या चौथ्या वनडेत सचिनने मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध ११४ धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० शतक करणारा तो पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. सचिनचा हा विक्रम आज देखील त्याच्या नावावर आहे. वाचा- सचिनने या सामन्यात १४७ चेंडूत ११४ धावा केल्या होत्या. ज्यात १२ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. सचिनने ९९वे शतक झळकावल्यानंतर १००वे शतक करण्यासाठी १ वर्ष ४ दिवस इतका वेळ लागला होता. या सामन्यात विराट कोहलीने ६६ तर सुरेश रैनाने ५१ धावा केल्या होत्या. भारताने या सामन्यात ५ विकेटच्या बदल्यात २८९ धावा केल्या होत्या. वाचा- बांगलादेशने विजयाचे लक्ष्य ४९.२ षटकात ५ विकेटच्या बदल्यात पार केले होते. तमीम इकबालने ७० तर जहारुल इस्लामने ५३ आणि नासिर हुसैनने ५४ धावा केल्या होत्या. या सामन्यात ४९ धावा करणाऱ्या शाकिब अल हसनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. वाचा- सचिनने १९९२ साली पहिले शतक झळकावले होते. त्याने करिअरमध्ये ५१ शतक कसोटीत तर ४९ शतक वनडे केली आहेत. सर्वाधिक २०० कसोटी खेळण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tCcvnR
No comments:
Post a Comment