नवी दिल्ली: जागतीक क्रिकेटमध्ये १६ मार्च ही तारीख ही एका मोठ्या विक्रमासाठी ओळखली जाते. आजच्या दिवशी २००७ मध्ये क्रिकेटमध्ये असा एक विक्रम झाला होता ज्याची त्याच्या आधी फक्त कल्पना केली जायची. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्डकपमधील ग्रुप ए मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड यांच्यातील सामन्यात हा विक्रम झाला होता. वाचा- सेंट कीट्स शहरातील वॉर्नर पार्क येथे झालेल्या लढतीत नेदरलँडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी करण्यास आमंत्रण दिले. पहिल्याच ओव्हरमध्ये एबी डिव्हिलियर्सला बाद करून नेदरलँडने चांगली सुरूवात केली. त्यानंतर कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि जॅक कॅलिस यांनी गोलंदाजांची धुलाई केली. स्मिथ ६७ धावांवर बाद झाला. वाचा- त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ( )ने ३०व्या षटकात अशी कामगिरी केली जी याआधी कधीच आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली नव्हती. इतक नव्हे तर त्यानंतर आजपर्यंत वनडे क्रिकेटमध्ये अशी कामगिरी कोणाला करता आली नाही. गिब्सने मारण्याचा महापराक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. गिब्सने ज्या मैदानावर हे षटकार मारले ते जगातील लहान क्रिकेट मैदानापैकी एक आहे. तरी त्याच्या विक्रमाचे महत्त्व कमी नव्हते. गिब्सने फिरकीपटू डान वेन बंगच्या ओव्हरमध्ये सलग सहा षटकार मारले. या सामन्यानंतर स्पर्धेचे प्रायोजक जॉनी वॉकर यांनी गिब्सला एक मिलियन डॉलरचा चेक दिला. हा चेक त्याने एका संस्थेला दिला. वाचा- क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे महान फलंदाज गॅरी सोबर्स यांनी आणि भारताच्या रवी शास्त्री यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली होती. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. गिब्सनंतर त्याच वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते. तर काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने टी-२० मध्ये श्रीलंकेविरुद्ध अशीच कामगिरी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vwP9kW
No comments:
Post a Comment