नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने काल क्रीडा अँकर संजना गणेशनसोबत गोव्यात विवाह केला. बुमराहने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. बीसीसीआयपासून ते भारतीय क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना एका क्रिकेटपटूकडून मात्र मोठी चूक झाली. वाचा- भारतीय कसोटी संघातील स्टार फलंदाज मयांक अग्रवालने देखील अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे बुमराह आणि संजना यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा देताना मयांककडून एक चूक झाली. या चुकीचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर जो स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. त्यानुसार मयांकने बुमराह आणि संजना यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्या देताना त्याने चुकून संजना गणेशनच्या ऐवजी संजय बांगर यांना टॅग केले. वाचा- ... मयांकला ही चूक लक्षात आल्यानंतर त्याने लगेच संबंधीत पोस्ट डिलिट केली. त्यानंतर नव्याने शुभेच्छा देणारे ट्विट केले. काल १५ मार्च रोजी बुमराहने संजना सोबत आयुष्याची नवी सुरुवात केली. या दोघांनी गोव्यात विवाह केला. आम्ही प्रेमाने एक नवा प्रवास सुरू करत आहोत. आमच्या दोघांसाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे. आम्हा दोघांना लग्नाची ही बातमी तुमच्यासोबत शेअर करताना आनंद होतोय, असे बुमराहने लग्नाचे फोटो शेअर करताना म्हटले होते. वाचा- बुमराहने वैयक्तीक कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्याने लग्नासाठी सुट्टी घेतल्याचे म्हटले होते. आता बुमराह टी-२० आणि वनडे मालिकेत देखील खेळणार नाही. तो थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rUlJet
No comments:
Post a Comment