नवी दिल्ली: पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांना कल्पना नव्हती की त्यांच्या सोबत काय होणार आहे. एक मार्च १९५८ रोजी २१ वर्षाच्या एका खेळाडूने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. यांनी वयाच्या २१व्या वर्षी सबीना पार्क येथे कसोटी करिअरमधील पहिले शतक झळकावले होते. या पहिल्या शतकात त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३६४ धावा केल्या होत्या. सोबर्स यांनी १९३८ साली इंग्लंडच्या लेन हेटन यांनी केलेल्या ३६४ धावांचा विक्रम मोडला होता. वाचा- सोबर्स यांच्या नावावर हा विक्रम ३६ वर्ष कायम होता. १९९४ साली वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने ३७५ धावा करत सोबर्स यांचा हा विक्रम मोडला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने ३८० धावा करत लाराचा विक्रम मागे टाकला. लाराने ४०० धावा करत हा विक्रम पुन्हा स्वत:च्या नावावर केला. सोबर्स यांनी पाकिस्तानविरुद्ध १० तास १४ मिनिटे फलंदाजी केली होती. दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी कॉर्नड हंटसह ४४६ धावा केल्या. हंट यांनी २६० धावांची खेळी केली होती. पाकिस्तानचे दोनच असे गोलंदाज होते ज्यांना दुखापत झाली नव्हती. फजल महमूद आणि खान मोहम्मद. महमूदने ८५.२ तर खानने ५४ षटक टाकली होती. वाचा- या साम्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इम्तियाज अहमदच्या १२२ धावांच्या जोरावर त्यांनी ३२८ धावा केल्या. उत्तरादाखल वेस्ट इंडिजने ३ बाद ७९० धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा चौथी मोठी धावसंख्या आहे. दुसर्या डावात पाकिस्तान २८८ वर बाद झाली. ही कसोटी वेस्ट इंडिजने १७४ धावांनी जिंकली. सोबर्स यांचा जन्म १९३६ रोजी बारबाडोस येथे झाला. सोबर्स यांच्या दोन्ही हातांना प्रत्येकी एक एक बोट अधिक होते. त्यांना एकूण १२ बोट होती. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला. १०व्या वर्षी एका हाताचे बोट तुटले. त्यानंतर १५व्या वर्षी त्यांनी ऑपरेशन करून ११वे बोट काढून टाकले. वाचा- फक्त फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीने देखील त्यांनी कमाल केली होती. ९३ कसोटीत सोबर्स यांनी ५७.७८च्या सरासरीने ८ हजार ३२ धावा केल्या. यात २६ शतक आणि ३० अर्धशतक आहेत. गोलंदाजीत त्यांनी २३५ विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात करण्याचा विक्रम आज देखील सोबर्स यांच्या नावावर आहे. त्यांनी २१ वर्ष २१३व्या दिवशी त्रिशतक केले. तर डॉन ब्रॅडमन यांनी ३१ वर्ष ३१८व्या दिवशी त्रिशतक केले होते. प्रथम श्रेणीत एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम प्रथम सोबर्स यांनीच केला होता. सोबर्स यांचे भारतीय अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यावर प्रेम होते. दोघांचा साखरपूडा देखील झाला होता. पण अंजू यांच्या घरच्यांनी विरोध केल्याने या दोघांचे लग्न झाले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kFTIEQ
No comments:
Post a Comment