नवी दिल्ली: बिहार क्रिकेट संघा (BCA)ने आता आणखी एका नव्या वादाला जन्म दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात ()ची परवानगी न घेता मान्यता नसलेल्या बिहार क्रिकेट लीग टी-२० स्पर्धेसाठीचा आयोजित केला. गेल्या काही काळापासून वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या बीसीएने एका नव्या वादला सुरूवात केली आहे. वाचा- बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने याआधीच स्पष्ट केले आहे की, कोणत्याही राज्यात टी-२० लीगसाठी आदी बीसीसीआयची मान्यता घेतली पाहिजे. पण बिहार बोर्डाने मंजूरीच्या आधीच शनिवारी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला. बिहार क्रिकेट संघाने ही स्पर्धा २१ ते २७ मार्च दरम्यान पटना येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत पाच संघ असतील. त्यात अंगिका एव्हेंजर्स, भागलपूर बुल्स, दरभंगा डायमंड्स, गया ग्लॅडिएटर्स आणि पटना पायलट्स हे संघ भाग घेणार आहेत. या सामन्याचे प्रसारण एका खासगी चॅनलवरून केले जाणार आहे. लिलावात खेळाडूंसाठी ५० हजार इतकी बोली ठेवण्यात आली होती. वाचा- राज्यातील स्पर्धांना मंजूरी देणाऱ्या बीसीसीआयच्या समितीच्या एका सदस्याने गोपनियतेच्या अटीवर माहिती दिली, जेवढी मला माहिती आहे त्यानुसार बिहार क्रिकेट संघाला २८ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही टी-२० लीगच्या आयोजनाची परवानगी दिली नाही. बीसीएचे अध्यक्ष राकेश तिवारी यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी मंजूरीसाठी अर्ज केल्याचे सांगितले. आम्ही बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. पण आतापर्यंत आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही. आम्ही वाट पाहू शकत नव्हतो. कारण कर्नाटक आणि तामिळनाडू प्रीमिअर लीग संदर्भात झालेल्या वादानंतर बीसीसीआयने एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाल्यानंतर देखील परवानगी दिली नव्हती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bKSNio
No comments:
Post a Comment