Ads

Tuesday, November 3, 2020

तुमचे मनापासून आभार; निवृत्त झाल्यानंतर वॉट्सन झाला भावूक, पाहा Video

नवी दिल्ली: आयपीएलच्या इतिहासात या वर्षी प्रथमच असे घडले असेल की चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला नाही. आयपीएलमधील सर्वात यशस्वी (३ जेतेपद) आणि सातत्याने कामगिरी करणाऱ्या संघात आता बदल दिसणार आहे. या वर्षी अखेरच्या ३ लढती विजय मिळून त्यांनी शेवट गोड केला. पण या विजयानंतर संघातील सलामीवर याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वाचा- रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यानंतर वॉट्सनने लीग क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. ही घोषणा त्याने सर्व प्रथम आपल्या सहकाऱ्यांसोबत शेअर केली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात वॉट्सन भावूक झाल्याचे दिसले. या व्हिडिओत वॉट्सनने चाहत्यांचे मनापासून आभार मानले. वाचा- या व्हिडिओत वॉट्सन अत्यंत भावूक दिसला. तो म्हणाला, २० वर्षाच्या क्रिकेट करिअरमध्ये मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाले त्याबद्दल मी भाग्यवान समजतो. गेल्या ३ वर्षापासून चेन्नइ सुपर किंग्जकडून खेळण्याची संधी मिळाली हा करिअरमधील सर्वात चांगला काळ होता. हा काळ कधीच विसरता येणार नाही. चेन्नईकडून खेळताना लोकांनी जे प्रेम दिले ते मी नेहमी लक्षात ठेवेन. त्याबाबत मी खुप नशिबवान आहे. हा क्षण माझ्यासाठी खुप भावनिक आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या या माजी सलामीवीराने याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. चेन्नई संघाने त्यांच्यावरील दोन वर्षाची बंदी उठवल्यानंतर २०१८ मध्ये वॉट्सनला संघात स्थान दिले होते. २०१८च्या अंतिम फेरीत वॉट्सनने शतक झळकावले होते आणि चेन्नईला तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिले होते. वाचा- चेन्नईकडून खेळण्याआधी वॉट्सन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळला होता. राजस्थानला २००८ साली पहिले विजेतेपद मिळून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. ३९ वर्षीय वॉट्सनने ऑस्ट्रेलियाकडून ५९ कसोटी, १९० वनडे आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने १४५ सामने खेळले असून त्यापैकी ४३ सामने चेन्नईसाठी खेळले आहेत. वाचा- या वर्षा देखील वॉट्सनने चेन्नईकडून काही सामन्यात महत्त्वाची खेळी केली होती. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने नाबाद ८३ धावा केल्या होत्या. २०१८च्या अंतिम सामन्यातील शतका शिवाय त्याने २०१९ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली होती. पण त्या सामन्यात चेन्नईला एक धावाने पराभव स्विकारावा लागला होता. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jWVbo2

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...