Ads

Tuesday, November 3, 2020

'मी याआधीच म्हटले होते, RCBमध्ये आयपीएल २०२० जिंकण्याचा दम दिसत नाही'

नवी दिल्ली: IPL 2020 () च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या () चा सोमवारी दिल्ली कॅपिटल्सकडून ६ विकेटनी पराभव झाला. अबुधाबीत झालेल्या या सामन्यात पराभव झाल्यानंतर देखील RCBने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. सामन्यात जर दिल्लीने १५३ धावांचा पाठलाग १७.३ षटकात केला असता तर बेंगळुरूचे रनरेट गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सपेक्षा कमी झाले असते. वाचा- आता प्ले ऑफच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची एलिमिनेटरमध्ये सनरायजर्स हैदराबाद किंवा कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत होणार होईल. जर आज मुंबई इंडियन्सने सनरायजर्सचा पराभव केला तर कोलकाता प्ले ऑफमधून बाहेर होईल. वाचा- वाचा- दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्न म्हणाला, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे सलग तीन सामन्यात विजय मिळवून आयपीएल २०२०चे विजेतेपद मिळवण्याचा दम नाही. वाचा- क्रिकबझवर बोलताना त्याला विचारण्यात आले की या वर्षी आयपीएलचे विजेतेपद मिळून शकते का? त्यावर तो म्हणाला, मला वाटत नाही की एकूणच त्यांच्या संघाकडे विजेतेपद मिळवण्याचा दम आहे. पण काहीही होऊ शकेत. २०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी बदलले आहे. कोणीच सांगू शकत नाही की काय होईल. विराट कोहली स्वत:च्या फलंदाजीच्या जोरावर संघाला विजेतेपद मिळून देऊ शकतो. पण हे काम खुप अवघड असे आहे. वाचा- बेंगळुरू संघाचा सलग चार सामन्यात पराभव झाला आहे. त्याच्या खेळाडूंमध्ये इतका दम दिसत नाही. जे प्ले ऑफमधील दबाव हाताळू शकतील. त्यांच्याकडे एकच पर्याय आहे की, आक्रमकपणे क्रिकेट खेळावे, असे वॉर्न म्हणाला. वाचा- ली नाही देवदत्त पडिक्कलने आणखी एक अर्धशतकी खेळी केली. पण एकूणच पाहिले तर त्यांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स मोठी धावसंख्या करू शकेल नाहीत. २०२० मध्ये विराट कोहली एक सामान्य फलंदाज झाला आहे. तो फार संघर्ष करतोय असे नाही. त्याने ४००हून अधिक धावा केल्या आहे. त्याचा स्ट्राइक रेट १२२ इतका आहे. पण विराट असा खेळाडू आहे ज्याचा स्ट्राइक रेट १४०च्या वर हवा. मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच फलंदाजांमध्ये विराटचा स्ट्राइकरेट सर्वात कमी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mMee6r

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...