दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामातील क्वालिफायल १ ची लढत आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. ही लढत ही लढत यांच्यात होणार असून विजय संघ थेट फायनलमध्ये पोहोचेल. तर पराभूत संघाला पुन्हा एक संधी मिळेल. मुंबईची आयपीएलमधील सुरूवात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झाली होती. या सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील मुंबईने शानदार कामगिरी केली आणि १३ पैकी ९ सामन्यात विजय मिळून गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. वाचा- मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही. पण अखेरच्या साखळी लढतीत रोहित सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मैदानात उतरला होता. या सामन्यात मुंबईचा १० विकेटनी पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी चढउतार अशी ठरली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने सुरुवातीला ९ पैकी ७ सामन्यात विजय मिळून दबदबा निर्माण केला होता. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना फक्त एक विजय हवा होता. पण त्या एका विजयासाठी त्यांना अखेरच्या साखळी लढतची वाट पाहावी लागली. १४व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव करत त्यांनी गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळवले. आज होणाऱ्या लढतीत मुंबईचा पराभव करून फायनल गाठण्याचे त्याचे लक्ष्य असेल. वाचा- २०२० मध्ये तिसऱ्यांदा लढत या दोन्ही संघात आयपीएलमध्ये ही तिसरी लढत होत आहे. पहिल्या दोन्ही लढतीत मुंबईने विजय मिळवला होता. पहिल्या लढतीत क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने पाच विकेटने जिंकला होता. तर दुसरा सामना मुंबईने एकतर्फी जिंकला. जसप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर इशान किशनने नाबाद ७२ धावा करत मुंबईने ९ विकेटनी विजय मिळवला. वाचा- जलद गोलंदाजी ही जमेची बाजू गेल्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. तर मुंबई दिल्लीविरुद्ध हॅटट्रिकचा प्रयत्न करेल. मुंबईने त्यांच्या अखेरच्या लढतीत ट्रेंट बोल्ट आणि जसप्रित बुमराह यांना विश्रांती दिली होती. आजच्या सामन्यात ते नक्कीच परत येतील. या दोघांनी मिळून ४३ विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे दिल्लीविरुद्धच्या दुसऱ्या साखळी लढतीत या दोघांनी ६ विकेट घेतल्या होत्या. मुंबईकडे बुमराह आणि बोल्ट असेल तर दिल्लीकडे कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्त्जे ही जोडी आहे. या दोघांनी १४ सामन्यात ४४ विकेट घेतल्या आहेत. रबाडाला हैदराबाद आणि मुंबई विरुद्ध एकही विकेट घेतला आली नव्हती. नॉर्त्जेने अखेरच्या सामन्यात ३ विकेट घेतल्या होत्या. फलंदाजीत देखील दम मुंबईकडे अनेक दमदार फलंदाज आहेत. रोहित अद्याप फार चमकला नसला तरी क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी धमाकेदार फलंदाजी केली आहे. दिल्लीकडे शिखर धवन सारखा फॉर्ममधील फलंदाज आहे. त्याने दोन शतके झळकावली आहेत. ऋषभ पंतचा फॉर्म हा दिल्लीसाठी समस्या ठरली आहे. अजिंक्य रहाणेने बेंगळुरूविरुद्ध चांगली फलंदाजी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3etp1zl
No comments:
Post a Comment