सिडनी: पाकिस्तानी वंशाचा ऑस्ट्रेलियाई क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाच्या भावाला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अर्सलान ख्वाजाने याने त्याच्या एका सहकाऱ्याला बनावट दहशतवादी हल्ल्यात फसवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी न्यायालयाने त्याला दीड वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण २०१८ सालचे आहे. उस्मानचा भाऊ अर्सलान ख्वाजाने त्याचा सहकारी मोहम्मद कामेर निझामेद्दीयाच्या पुस्तकात दहशतवादी हल्ल्याबद्दल लिहले होते. त्यानंतर अर्सलानने ते न्यू साउथ वेल्स विद्यापीठाचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना दिले. वाचा- या प्रकरणात जेव्हा पोलिसांनी लक्ष घातले तेव्हा ४० वर्षीय अर्सलानने पोलिसांना चुकीचा जबाब दिला. संबंधित पुस्तक त्याला असेच मिळाले होते. प्रत्यक्षात अर्सलानला कामेरशी इर्षा करायचा. यामुळेच त्याला अडकवण्यासाठी ही कृत्य केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले. वाचा- न्यू साऊथ वेल्स डिस्ट्रिक्ट कोर्टचे न्यायाधिश रॉबर्ट वेबरने गुरुवारी या प्रकरणी निकाल दिला. कामेर ज्या मुलीसोबत प्रेम करत होता आणि ते दोघे लवकरच लग्न करणार होते. न्यायालयाने अर्सलानला चार वर्ष आणि ६ महिन्याची शिक्षा सुनावली. अर्सलान २०१८ पासून तुरुंगात असल्यामुळे पुढील वर्षी जून मध्ये त्याला पेरोल मिळू शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38eh1RZ
No comments:
Post a Comment