नवी दिल्ली: Playoff आयपीएलच्या १३व्या हंगामातील साखळी सामन्यात फक्त दोन लढती शिल्लक आहेत आणि अद्याप प्ले ऑफमधील चार पैकी तीन संघ कोणते हे ठरले नाही. मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानी राहणार हे पक्के झाले आहे. अन्य तीन जागांवर कोणते संघ असतील हे अद्याप निश्चित झाले नाही. यासाठी चार संघांमध्ये चुरस आहे. वाचा- रविवारी झालेल्या डबल हेडरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचे आव्हान संपुष्ठात आले. त्याआधी चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान सर्व प्रथम संपुष्ठात आले होते. मुंबई इंडियन्स १८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. आज सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील लढतीने दुसरे स्थान कोणाला मिळेल हे निश्चित होईल. पण तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी चुरस कायम असेल. वाचा- अशा आहेत शक्यता... १) मुंबई इंडियन्सचे गुणतक्त्यातील पहिले स्थान पक्के आहे. अन्य कोणत्याही संघाला तितके गुण मिळवता येणार नाही. मुंबई संघाचा अद्याप एक सामना शिल्लक आहे आणि त्यांना २० गुण मिळवण्याची संधी आहे. २) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील लढतीत जो विजय होईल ते १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. ३) कोलकाता नाइट रायडर्सच्या १४ गुणांसह अन्य एका किंवा दोन संघासोबत टाय होणे निश्चित आहे. वाचा- ४) मंगळवारी होणाऱ्या लढतीत मुंबईने हैदराबादचा पराभव केल्यास कोलकाताचे दिल्ली किंवा बेंगळुरु यांच्याशी १४ गुणांसह टाय होईल. अशा परिस्थितीत नेट रनरेटच्या आधारे तिसरे आणि चौथे स्थान निश्चित होईल. ५) हैदराबादने मंगळवारी मुंबईचा पराभव केल्यास कोलकाता, हैदराबाद आणि दिल्ली किंवा बेंगळुरू यांचे प्रत्येकी १४ गुण होतील. तेव्हा नेट रनरेटद्वारे जे दोन संघ पुढे असतील त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळेल. ६) तसे झालेच तर हैदराबादचा संघ तिसऱ्या स्थानावर असेल. कारण त्यांचे नेट रनरेट दिल्ली, बेंगळुरू आणि कोलतातापेक्षा अधिक आहे. ७) आजच्या लढतीत कोलकाताची इच्छा असेल की, दिल्ली किंवा बेंगळुरू मोठ्या फरकाने पराभूत होईल. जेणे करून पराभूत होणाऱ्या संघाचे नेट रनरेट कोलकातापेक्षा खराब होईल. वाचा- ८) गुणतक्त्यात राजस्थान सर्वात तळाला गेला आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज सातव्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाब सहाव्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात चुरशीची स्पर्धा ठरली आहे. तळातील दोन संघांनी १२ गुण मिळवले आहेत. साखळी फेरीत फक्त दोन सामने शिल्लक आहेत आणि अद्याप प्ले ऑफमधील तीन संघ निश्चित झाले नाहीत. चेन्नई, पंजाब आणि राजस्थान बाहेर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि बेंगळुरूचे स्थान निश्चित मानले जाता होते. पण आता काहीच निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही. आयपीएलमध्ये अखेरच्या सामन्यापर्यंत निश्चित न होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सामन्याच्या निकाला सोबत नेट रनरेट देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jO2ePS
No comments:
Post a Comment