नवी दिल्ली: २०२० मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ९ विकेटनी पराभव केला. या हंगामाच्या प्ले ऑफमधून आधीच बाहेर पडलेल्या चेन्नईने पंजाबच्या परतीच्या तिकीटाची सोय केली. प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी पंजाबला विजय आवश्यक होता. चेन्नईने अखेरच्या लढतीत विजय मिळवून हंगामाचा शेवट सकारात्मक केला. वाचा- किंग्ज इलेव्हन पंजाबवरील विजयाने () संघाने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की हाच संघ स्पर्धेतील सर्वात आव्हान देणारा आहे. आयपीएलच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे की गुणतक्त्यात तळाळा असणाऱ्या संघाने सहा विजयांसह १२ गुण मिळवले आहेत. आयपीएलच्या १३ हंगामात असे कोणत्याही संघाला जमले नव्हते. सध्या गुणतक्त्यात मुंबई इंडियन्स १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि पुढील सामन्यात विजय मिळून ते २० गुणांपर्यंत पोहोचू शकतात. वाचा- चेन्नई सुपर किंग्जची आयपीएलमधील कामगिरी अन्य कोणत्या संघांपेक्षा अधिक सातत्यापूर्ण आहे. २०२०चा अपवाद वगळता चेन्नईने सहभाग घेतलेल्या सर्व हंगामात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते. त्यांनी १० प्ले ऑफ आणि ८ फायनल लढती खेळल्या आहेत. वाचा- CSK संघात होणार मोठा बदल... किंग्ज इलेव्हनवर विजय मिळवल्यानंतर धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षासाठी संघाच्या कोअर ग्रुपमध्ये बदल करण्याची गरज आहे आणि पुढील १० वर्षाच्या विचार करून संघाची बांधणी करावी लागले. त्याच बरोबर धोनीने हीच वेळ आहे जेव्हा संघाला पुढच्या पिढीकडे सोपवण्याची... धोनीने देखील ही गोष्ट मान्य केली. बोर्ड लिलावा संदर्भात कोणता निर्णय घेते त्यावर सर्व गोष्टी ठरतील. पण संघातील कोअर ग्रुपमध्ये बदल करावा लागेल हे त्याने मान्य केले. पुढील १० वर्षावर फोकस करावा लागेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35T6UyZ
No comments:
Post a Comment