
दुबई : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यांमध्ये आता पहिला क्वालिफायर्सचा सामना रंगणार आहे. पण दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर हा मुंबईकर आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्याबाबत अय्यर नेमकं काय म्हणाला आहे, पाहा... सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने आरसीबीचा पराभव केला. या विजयासह दिल्लीने दोन गुणांची कमाई केली. या दोन गुणांसह दिल्लीने गुणतालिकेत आरसीबीला धक्का देत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता दिल्लीचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर क्वालिफायर्स-१मध्ये होणार आहे. या सामन्यासाठी आपण सज्ज असल्याचे अय्यरने यावेळी सांगितले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याबाबत अय्यर यावेळी म्हणाला की, " मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दबाव सर्वात महत्वाचा असेल. हा दबाव किंवा दडपण आम्ही कसे हाताळतो, हे आमच्यासाठी सर्वात महत्वाचे ठरणार आहे. कारण मुंबईचा संघ हा चांगलाच समतोल आहे आणि त्यांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या आयपीएलमध्ये प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा मुंबई हा पहिला संघ होता. त्यामुळे आमच्यासाठी या सामन्यात काही गोष्टी फार महत्वाच्या असतील. या सामन्यात दडपण असतानाही गोष्टी कशा सहजपणे करता येतील, यावर आमचा जास्त भर असेल." यापुढे अय्यर म्हणाला की, " आम्ही अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबी संघावर विजय मिळवला. त्यामुळे संघाचे मनोबल चांगलेच उंचावलेले आहे. आम्हाला सलग चार सामने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आम्हाला हा पाचव्या सामन्यात विजय मिळाला. त्यामुळे संघात नक्कीच आनंदाचे वातावरण आहे. मीदेखील या विजयानंतर आनंदीत झालो आहे. पण आता पुढच्या सामन्याची रणनिती नेमकी कशी असेल, यावर आम्ही विचार करणार आहोत." आरसीबीने दिल्लीपुढे १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग दिल्लीच्या संघाने केला. या सामन्यानंतर आरसीबीच्या संघाची दुसऱ्या स्थानावरून घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. पण तरीही आरसीबीचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचला. यावेळी १७.३ षटकांचे आव्हान आरसीबीच्या संघाकडे होते. आरसीबीला १७.३ षटकांपर्यंत दिल्ली विजय मिळवू द्यायचा नव्हता आणि हेच समीकरण यावेळी महत्वाचे ठरल्याचे पाहायला मिळाले. जर दिल्लीने विजयासाठीच्या १५३ धावा या १७.३ षटकांपूर्वी केल्या असत्या तर आरसीबीचे प्ले-ऑफमधील स्थान डळमळीत होऊ शकले असते. पण आरसीबीचा पराभव झाला असला तरी त्यांनी दिल्लीने हे आव्हान १९ षटकांमध्ये पूर्ण केले. त्यामुळेच या सामन्यानंतर दिल्ली आणि आरसीबी या दोन्ही संघांनी प्ले-ऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/360lu7V
No comments:
Post a Comment