
दुबई : काही दिवसांपूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर व विराट कोहलीची पत्ती अनुष्का शर्मा यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. आता या वादामध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उडी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. या वादाबद्दल आणि अनुष्का व गावस्कर यांच्याबद्दल शास्त्री यांनी नेमके काय म्हटले आहे, पाहा... रवी शास्त्री यांनी या वादाबाबत नेमके काय सांगितले, पाहा...रवी शास्त्री हे 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीच्या फ्रँकली स्पिकींग या कार्यक्रमात आले होते. यावेळी शास्त्री यांना गावस्कर आणि अनुष्का यांच्यातील वादाबाबत शास्त्री यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी शास्त्री म्हणाले की, " आपल्याकडे प्रत्येकाला बोलण्याचा, आपली मते मांडण्याचा नक्कीच अधिकार आहे. गावस्कर यांनी आपले मत मांडले होते. त्यावेळी गावस्कर यांच्या म्हणण्यानंतर अनुष्काला वाईट वाटले असेल आणि तिने जर याबाबत आपले मत व्यक्त केले तर त्यामध्ये चुकीचे काहीच नाही. पण मी अशा प्रकारचे वक्तव्य करत नाही आणि अशा प्रकारच्या वक्तव्यांच्या वाटेलाही जात नाही." शास्त्री यांनी आपले मत व्यक्त केल्यावर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रीया आल्या. बऱ्याच चाहत्यांनी शास्त्री यांनी यावेळी अनुष्काची बाजू घेतली असून गावस्कर यांना फटकारल्याचेही, चाहते म्हणत आहेत. पण शास्त्री यांनी मात्र अशी थेट भूमिका मांडलेली पाहायला मिळत नाही. सुनील गावस्कर यांनी नेमकी काय टीका केली होती...आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात विराट कोहलीकडून एकाच सामन्यात २-३ झेल सुटले. विराटकडून जेव्हा हे झेल सुटले तेव्हा गावस्कर हे समालोचन करत होते. त्यावेळी गावस्कर यांनी विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त कोहलीने अनुष्काबरोबरच सराव केला, असे म्हटले. त्यावेळी चांगलाच हास्यविनोद पाहायला मिळाला. पण त्यानंतर मात्र या त्यांच्या वक्तव्यावर वाद झाल्याचेही पाहायला मिळाले. अनुष्काने गावस्कर यांना नेमके काय उत्तर दिले...यावेळी अनुष्का म्हणाली की, " खेळावर भाष्य करताना गेल्या इतक्या वर्षात तुम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला असेल याची मला खात्री आहे. तितकाच आदर मला आणि आम्हाला असावा असं तुम्हाला वाटत नाही का?"
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34UQIhD
No comments:
Post a Comment