
दुबई : या वर्षीचा आयपीएलचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलचे. यावर्षी करोनामुळे आयपीएलचा लिलाव होऊ शकला नाही. त्यामुळेच आता पुढच्या वर्षी आयपीएलचा लिलाव मोठ्या प्रमाणात होणार का, याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही अपडेट्स दिले आहेत. या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, किंग्स इलेव्हन पंजाब या संघांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच ते या आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी होणारे आयपीएल या सर्व संघांसाठी महत्वाचे असेल. पुढच्या हंगामात कोणत्या नवीन खेळाडूंना आपल्या संघात स्थान द्यायचे, याचा निर्णय लिलावामध्येच होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच आता पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या लिलावाची प्रतिक्षा आहे. चेन्नईच्या संघासाठी हा लिलाव सर्वात महत्वाचा असेल. कारण चेन्नईच्या संघाला आता नवीन संघ उभारावा लागणार आहे. शेन वॉटसनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याचबरोबर संघातील बरेच खेळाडू पुढच्या वर्षी खेळू शकणार नाही, असे दिसत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी संघ बांधणी करताना चेन्नईच्या संघाला बरेच नवीन खेळाडू संघात घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे या लिलावात नेमके काय होते, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. जर आयपीएलचा लिलाव मोठ्या प्रमाणात झाला तर जास्त खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होऊ शकतील. कारण त्यावेळी प्रत्येक संघाला फक्त तीन खेळाडूंना आपल्याकडे कायम ठेवता येणार आहे. त्यामुळे आयपीएलचा पुढच्या व्रषी मोठा लिलाव झाला तर नक्कीच संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या लिलावाबाबत गांगुली यांनी सांगितले की, " सध्याच्या घडीला आमचे लक्ष सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेवर आहे. ही आयपीएल स्पर्धा संपली की आम्ही पुढच्या हंगामाताबाबत विचार करू, पण आता याबाबत काहीच विचार केलेला नाही. लिलाव होण्यापूर्वी करोनाची लस उपलब्ध व्हायला हवी. त्यानंतरच आम्ही लिलावाबाबतचा निर्णय घेण्याचा विचार करत आहोत."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jQdqeR
No comments:
Post a Comment