Ads

Tuesday, November 3, 2020

IPL मधील या घटनेमुळे सचिन तेंडुलकर अस्वस्थ झाला; आयसीसीसह सर्व बोर्डांना केले आवाहन

नवी दिल्ली: आयपीएलचा १३वा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. ३ संघांनी आतापर्यंत प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले आहे. यात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांचा समावेश होते. आज होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढतीत प्ले ऑफमध्ये चौथी टीम कोणती असेल याचा फैसला होईल. वाचा- २०२० मध्ये चाहत्यांना अनेक चुरशीचा लढती पाहायला मिळाल्या. इतक नव्हे तर क्रिकेटच्या इतिहासातील पहिली डबल सुपर ओव्हरची मॅच देखील पाहता आली. पण या वर्षी आयपीएलमधील एका घटनेमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची काळजी वाढवली आहे. सचिनने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाचा- सचिनने ट्विटवर एक घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू विजय शंकर जखमी होता होता थोडक्यात वाचला. आयपीएलच्या ४३व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या लढती विजय शंकर धाव घेत असताना निकोलस पूरनने विकेटच्या दिशेने फेकलेला चेंडू विजयच्या हेल्मेटला लागला. तेव्हा वाटले की विजयला दुखापत झाली असावी. पण तसे काही झाले नाही. वाचा- वाचा- या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी आणि अन्य सर्व देशातील क्रिकेट बोर्डांना एक विनंती केली आहे. सचिनच्या मते मैदानावर सर्व फलंदाजांना हेल्मेट घालणे सक्तीचे करावे. तो म्हणतो, निश्चितपणे सध्या खेळ वेगवान झाला आहे. पण सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. गेल्या काही काळात आपण अशा घटना पहिल्या आहेत ज्यात खुप काही वाइट घडू शकले असते. गोलंदाज फिरकीपटू असो की जलद हेल्मेट घालणे फलंदाजांसाठी सक्तीचे केले जावे. मी आयसीसीला विनंती करतो की हा नियम लवकरात लवकर क्रिकेटमध्ये लागू करावा. वाचा- सचिन तेंडुलकरच्या या ट्विटवर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या मताशी अनेकांनी सहमती दर्शवली आहे. सचिने या ट्विटसोबत दुसऱ्या एका ट्विटमध्ये सर्व क्रिकेट बोर्डांना टॅग केले आहे. त्याच्या या ट्विटनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील जुन्या एका घटनेबद्दल सांगितले. शास्त्री म्हणतात, मला एक घटना आता आठवते. जेव्हा एका सराव सामन्यात गावस्कर यांनी टाकलेला फुलटॉस चेंडू टॉप एजला लागला होता आणि गंभीर दुखापत होण्याची धोका होता. पण तसे काही झाले नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TVmdBz

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...