Ads

Sunday, November 1, 2020

IPL 2020: मानहानीकारक पराभवानंतर राजस्थानचे आव्हान संपुष्टात, केकेआर प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम

आबुधाबी: आज झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पण दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सने आजच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या विजयासह कोलकाताचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोलकाताने राजस्थानपुढे १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. त्यामुळेच त्यांना या सामन्यात ६० धावांनी लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. कोलकाताचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने यावेळी चार बळी मिळवत राजस्थानचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळाले. कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. कमिन्सने यावेळी सुरुवातीलाच राजस्थानला मोठे धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. कमिन्सने यावेळी पहिल्याच षटकात रॉबिन उथप्पाला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. उथप्पाला यावेळी सहा धावांवरच समाधान मानावे लागले. कमिन्सने त्यानंतरच्या तिसऱ्याच षटकात राजस्थानला दुहेरी धक्के दिले. तिसऱ्या चेंडूच्या पहिल्याच चेंडूवर कमिन्सने यावेळी सलामीनीर बेन स्टोक्सला बाद करत संघाला दुसरे यश मिळवून दिले. स्टोक्सने यावेळी १८ धावा केल्या. त्यानंतर या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कमिन्सने राजस्थानला मोठा धक्का दिला. कमिन्सने यावेळी राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथला त्रिफळाचीत केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. कमिन्स एकिकडून भेदक मारा करत असताना दुसऱ्या बाजूने शिवम मावीही अचूक मारा करत होता. मावीने चौथ्या षटकात राजस्थानचा संजू सॅमसनला बाद करत संघाला चौथे यश मिळवून दिले. संजूला यावेळी एका धावेवरच समाधान मानावे लागले. पाचव्या षटकात कमिन्सने पुन्हा एकदा कोलकाताना एक यश मिळवून दिले. कमिन्सने पाचव्या षटकात राजस्थानच्या रायन पगारला बाद केले, परागला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. कोलकाताने यावेळी भदक मारा करत राजस्थानची ५ बाद ३७ अशी दयनीय अवस्था केली होती. त्यानंतर जोस बटलर आणि राहुल तेवातिया यांच्यामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात बटलरने आपली विकेट गमावली. बटलरने यावेळी २२ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३५ धावा केल्या. बटलर बाद झाल्यावर राजस्थानचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्याचे पाहायला मिळाले. कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने आजच्या करो या मरो सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. खासकरून कोलकाताचा कर्णधार इऑन मॉर्गनने यावेळी राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत अर्धशतक साजरे केले. त्यामुळेच आजच्या महत्वाच्या सामन्यात कोलकाताला राजस्थानपुढे १९२ धावांचे तगडे आव्हान ठेवता आले. मॉर्गनने यावेळी फक्त ३४ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ehp1Cw

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...