आबुधाबी: कोलकाता नाइट रायडर्सने आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या सामन्यापूर्वी कोलकाताचा संघ आठव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर कोलकाताने गुणतालिकेत महत्वाचे स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी कोलकाताचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. या सामन्यापूर्वी कोलकाता संघ १३ लढती खेळला होता. या १३ सामन्यांमध्ये कोलकाताने ६ विजय मिळवले होते, तर त्यांना सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावे लागले होते. त्यामुळे कोलकाताचा संघ त्यावेळी आठव्या स्थानावर होता. आजच्या १४व्या सामन्यात कोलकाताने राजस्थानवर मोठा विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने दोन गुण पटकावले. या दोन गुणांसह कोलकाताचे आता १४ गुण झाले आहेत. त्यामुळे कोलकाताने आठव्या स्थानावर थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील कोलकाताचे आव्हान अजूनही जीवंत आहे. आजच्या सामन्यातील पराभवानंतर राजस्थानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. कारण सध्याच्या घडीला राजस्थानने १४ सामने खेळले आहेत. या १४ सामन्यांमध्ये राजस्थानला ६ विजय मिळवता आले तर आठ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सध्याच्या घडीला राजस्थानचे १२ गुण आहे. आता प्ले-ऑफची शर्यत ही १४ गुणांतील संघांमध्ये होणार आहे. त्यामुळे खात्यात १२ गुण असलेल्या राजस्थानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स हा एकमेव संघच प्ले-ऑफमध्ये पोहोचला आहे. सध्याच्या घडीला आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांचे समान १४ गुण आहे. सोमवारी आरसीबी आणि दिल्ली यांच्यामध्ये सामना होणार असून त्यानंतर गुणतालिकेत दुसरे आणि तिसरे स्थान कोण पटकावू शकतो, हे जवळपास स्पष्ट होऊ शकते. पण सनरायझर्स हैदराबादचा संघही या शर्यतीत आहे. त्यांचा अखेरचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर होणार आहे. हा सामना जर हैदराबादने जिंकला तर गुणतालिकेत मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे आता होणाऱ्या दोन सामन्यांवर या सर्व संघांचे भवितव्य अवलंबून असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2GhJcDQ
No comments:
Post a Comment