नवी दिल्ली: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माची निवड झाली नाही. रोहित फिट नसल्याने त्याला वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला रोहित आयपीएलमध्ये सराव करताना दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याला संघात स्थान न दिल्यावरून सर्वांना आश्चर्य वाटत आहे. रोहित अद्याप फिट नसल्याने रोहितच्या गैरहजेरीत केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित फिट झाला तर त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो असे देखील बोलले जात आहे. या सर्व घटनांमुळे भारतीय संघात काही तरी गडबड सुरू असल्याची चर्चा आहे. वाचा- रोहित शर्माला संघात न घेण्याच्या निर्णयाबद्दल संघाचे मुख्य प्रशिक्षक यांनी मत व्यक्त केले आहे. रोहित जर पूर्ण फिट नसेल तर त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ नये. त्याची निवड झाली नाही यावर शास्त्री म्हणाले, ही गोष्टी वैद्याकीय अहवाल आणि फिजिओथेरेपिस्टवर अवलंबून असते. रोहित संघात का नाही? याबद्दल मला माहिती नाही. मला माहित नाही की त्याच्या वैद्यकीय अहवालात काय लिहले आहे. वाचा- वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेल्या कसोटी, वनडे आणि टी-२० संघात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला नाही. आयपीएलमध्ये एका सामन्यात दुखापतीमुळे त्याला बाहेर जावे लागले होते. त्यानंतर तो गेल्या ४ सामन्यात खेळू शकला नाही. विशेष म्हणजे ज्या दिवशी संघाची घोषणा करण्यात आली होती त्याच दिवशी रोहितचा सरावाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला होता. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी रोहितच्या सरावाबद्दल देखील सांगितले. एका खेळाडूसाठी दुखापत ही निराश करणारी गोष्ट आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता. समस्येवर मात करून तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करत असता. फक्त तुम्हालाच याचा अंदाज असतो की तुम्ही १०० टक्के फिट आहात की नाहीत. वाचा- मी स्वत: एक क्रिकेटपटू आहे. मी १९९१ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि ऑस्ट्रेलियाला गेलो. येथे मला जायचे नव्हते. मी ३ ते ४ महिन्याचा ब्रेक घेतला आणि फिट होऊन परत आलो असतो तर आणखी ५ वर्ष भारतासाठी खेळू शकलो असतो. पण डॉक्टरांनी मला जाऊ दिले नाही. रोहित एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने पूर्ण फिट झाल्याशिवाय दौऱ्यावर जाऊ नये.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HKZXZ3
No comments:
Post a Comment