दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामातील अखेरच्या साखळी लढतीत सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा पराभव करून प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले. गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर, दुसऱ्या स्थानावर, सनरायजर्स तिसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफमधील पहिली लढत म्हणजे क्वालिफायर १ ५ नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. या लढतीत विजय होणारा संघ थेट फायनल मध्ये पोहोचेल तर पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळेल. दुसरी लढत म्हणजे एलिमेनेटर ६ नोव्हेंबर रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यात होणार आहे. या लढतीत जो विजय मिळवेल त्यांना मुंबई आणि दिल्ली यांच्यातील पराभूत संघासोबत लढावे लागेल आणि विजय संघ अंतिम फेरीत पोहोचेल. २०२०ची फायनल १० नोव्हेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवली जाईल. प्ले ऑफचे वेळापत्रक ५ नोव्हेंबर- क्वालिफायर १: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ६ नोव्हेंबर- एलिमेनेटर: सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ८ नोव्हेंबर- क्वालिफायर २ : मुंबई/दिल्ली विरुद्ध हैदराबाद/बेंगळुरू १० नोव्हेंबर- फायनल मॅच: क्वालिफायल १ चा विजेता क्वालिफायर २ चा विजेता
- आयपीएल २०२०च्या प्ले ऑफमध्ये कोणते संघ पोहोचले आहेत?मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
- आयपीएल २०२०च्या गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर कोणता संघ आहे?मुंबई इंडियन्स
- आयपीएल २०२०ची फायनल कधी आणि कोणत्या मैदानावर होणार आहे?आयपीएल २०२०ची फायनल १० नोव्हेंबर २०२० रोजी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे
- आयपीएल २०२०ची क्वालिफायल १ ची लढत कोणत्या संघादरम्यान होणार आहेक्वालिफायर १ ची लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे
- आयपीएल २०२०च्या एलिमेनेटरची लढत कधी आणि कोणत्या दोन संघात होणार आहेएलिमेनेटर लढत ६ नोव्हेंबर २०२० रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ennxGQ
No comments:
Post a Comment