नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात खेळताना जखमी झालेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार () पुन्हा एकदा फिट होऊन मैदानात परतला आहे. भारतीय संघातील स्टार ओपनर असलेल्या रोहित जखमी असल्यामुळे ऑस्ट्रोलिया दौऱ्यात त्याला संधी दिली नव्हती. आयपीएल झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. रोहित काल झालेल्या साखळी सामन्यात मैदानात उतरला होता त्यानंतर त्याने स्वत: मी पूर्णपणे बरा झाल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे काल बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले होते की, जर रोहित फिट असेल तर निवड समिती त्याचा संघात समावेश करण्या संदर्भात विचार करू शकते. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुनिल जोशी यांच्या नेतृत्वाखालील समितीने निवडलेल्या भारतीय संघाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे हा प्रश्न सर्व जण विचार होतो. तो पुन्हा संघा येऊ शकतो असे असेल तर केएल राहुलला वनडे आणि टी-२०चा उपकर्णधार का करण्यात आले? आदी प्रश्न विचारले जात होते. मुंबई इंडियन्सकडून सातत्याने हे संकेत दिले जात होते की, रोहितची दुखापत इतकी गंभीर नाही. अशातच काल सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या लढतीत रोहित शर्मा खेळल्याने सर्व प्रश्नांची उत्तरे मिळली. पण निवड समिती किंवा बीसीसीआयने रोहित संदर्भात दिलेला शब्द पाळणार का हा प्रश्न सर्व जण विचारत आहेत. वाचा- रोहितच्या दुखापतीसंदर्भात निवड समिती, बीसीसीआय, सौरव गांगुली ते अगदी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील तो फिट असेल तर नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असेल असे म्हटले होते. गांगुलीने कालच म्हटले होते की, जर रोहित फिट असेल तर नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्याला पाठवण्याबाबत विचार केला जाईल. वाचा- रोहित जाणार का ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर? बीसीसीआयचे बॉस अर्थात गांगुलीने हे स्पष्ट केले होते की, रोहित शर्माने फिटनेस सिद्ध केल्यास तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो तर निवड समितीला देखील त्यावर लक्ष द्यावे लागले. आयपीएलमधील पुढील सामन्यात रोहितने फिटनेस दाखवला तर नक्कीच आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची निवड होऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TU77MY
No comments:
Post a Comment