शारजा: गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेत असलेला विषय म्हणजे कधी मैदानात खेळण्यास येणार हा होय. युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल २०२० मध्ये गेल्या काही सामन्यात रोहित खेळला नव्हता. त्याच बरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दुखापतीमुळे त्याची निवड करण्यात आली नव्हती. अखेर काल साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत रोहित शर्मा पुन्हा मैदानावर आला आणि त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. दुखापतीमुळे रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचार केला गेला नाही असे म्हटले जात होते. पण त्याच बरोबर तो फिट झाला तर संघात नक्कीच घेतले जाईल असेही सांगण्यात येते होते. रोहित जर परत येणार असेल तर केएल राहुलला उपकर्णधार करण्याची घाई कसली होती असा देखील प्रश्न विचारला जात होता. काल रोहित पुन्हा एकदा मैदानात आल्याने हे स्पष्ट झाले की तो आता फिट आहे. वाचा- सनरायजर्स विरुद्धच्या लढतीनंतर रोहितने स्वत:च्या दुखापतीबद्दल सांगितले. तो म्हणाला, हॅमस्ट्रिंग दुखापतीमधून मी आता पूर्णपणे बरा झालो आहे. दुखापतीमुळे दोन आठवड्याच्या ब्रेकनंतर मैदानावर परतल्याने मी आनंदी आहे. मैदानावर खेळण्याचा आनंद वेगळा असतो. काही सामने खेळायचे आहेत आणि त्यानंतर बघू कसे काय होते. हॅमस्ट्रिंग आता पूर्णपणे बरे झाले आहे. वाचा- हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळेच रोहितचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विचार केला गेला नाही. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर काल सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्यांने पुन्हा एकदा नेतृत्व केले. या सामन्यात मुंबईचा १० विकेटनी पराभव झाला. या हंगामातील मुंबई इंडियन्सची ही सर्वात खराब कामगिरी होती. मुंबईवरील विजयामुळे सनरायजर्सने प्ले ऑफमध्ये जागा निश्चित केली. पराभवानंतर रोहित म्हणाला, हा दिवस आम्ही कधीच लक्षात ठेवणार नाही. या सत्रातील सर्वात खराब कामगिरी झाली. आम्ही जे प्रयोग केले ते चालले नाहीत. आघाडीच्या फलंदाजांनी लवकर विकेट गमावल्या. वाचा- या गोष्टीकडे दोन प्रकारे पाहता येईल. मैदानावर दव असते आणि नाणेफेक जिंकल्यानंतर निराश होऊ नये. आम्ही धावा करू शकलो नाही ज्यामुळे दबाव निर्माण करू शकू. पॉवर प्लेमध्ये विकेट घेता आल्या नाहीत. हा पराभव विसरून पुढील सामन्यात विजयाच्या मार्गावर पोहोचू, असे रोहित म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2U4ZVxH
No comments:
Post a Comment