
नवी दिल्ली: IPL 2020 () ने २०२०मध्ये ५५व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६ विकेटनी पराभव केला आणि गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळवले. दिल्ली संघाने सलग दुसऱ्यांदा प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. यासह दिल्लीने आयपीएलच्या इतिहासात एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. वाचा- आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज असा एकमेव संघ आहे ज्याने या वर्षाचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले. त्यांनी खेळलेल्या ११ पैकी १० वेळा प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले, तर ८ वेळा फायनल खेळले आहेत. दिल्ली संघाने या वर्षी गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळवले. आयपीएलच्या इतिहासात गुणतक्त्यात सर्व स्थान मिळवणारे तो पहिला संघ ठरला आहे. आयपीएलमधील हा नवा विक्रम आहे. वाचा- दिल्ली संघ २००९ आणि २०१२ साली गुणतक्त्यात पहिल्या, २०२० मध्ये दुसऱ्या, २०१९ तिसऱ्या, २००८ साली चौथ्या २०१० साली पाचव्या, २०१६ आणि २०१७ साली सहाव्या, २०१५ साली सातव्या, २०१४ आणि २०१८ साली चौथ्या आणि २०१३ साली नवव्या तर २०११ साली दहाव्या स्थानावर होती. दिल्ली संघासारखी कामगिरी अन्य कोणत्या संघाची नाही. दिल्लीने पाचव्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या चार वेळा त्यांना फायनलमध्ये पोहोचता आले नव्हते. या वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली त्याचे लक्ष्य फायनलमध्ये पोहोचण्याचे असेल. वाचा- दिल्लीने बेंगळुरूचा सलग चौथ्यांचा पराभव केलाय. २०१९ पासून दिल्ली नेहमीच विराटच्य संघावर सरस ठरली आहे. काल झालेल्या सामन्यात बेंगळुरूने २० षटकात ७ बाद १५२ धावा केल्या होत्या. दिल्लीने विजयाचे लक्ष्य १९व्या षटकात चार विकेटच्या बदल्यात पार केले. दिल्लीकडून अजिंक्य रहाणेने ६० तर शिखर धवनने ५४ केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34PiNqy
No comments:
Post a Comment