
नवी दिल्ली: आयपीएलचा १३वा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याव जाणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची निवड झाली. निवड समितीने संघातील महत्त्वाचा खेळाडू रोहित शर्माला दुखापतीमुळे स्थान दिले नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या रोहितच्या फिटनेसवरून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. रोहित नेटमध्ये सराव करताना दिसत आहे मग संघात स्थान का दिले गेले नाही असा प्रश्न अनेक जण विचारत आहे. यावर माजी खेळाडूंनी आणि क्रिकेट समिक्षकांनी बोलल्यानंतर आता खुद्द भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. वाचा- आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात जो डबल सुपर ओव्हरमध्ये गेला होता. त्यानंतर रोहित एकीही सामना खेळला नाही. असे असताना रोहितचा सराव करणारा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने शेअर केला होता. रोहितला संघात न घेतल्यावरून सोशल मीडियावर देखील बरेच काही बोलले गेले. यात आता अध्यक्ष गांगुलीने रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार का याबद्दल मत व्यक्त केले आहे. वाचा- एका मुलाखतीत गांगुली म्हणाला, आपल्या सर्वांची इच्छा आहे की रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर जावा. पण तो फिट झाला पाहिजे. जर तो फिट झाला तर निवड समिती पुन्हा त्याला संघात घेण्याबद्दल नक्कीच विचार करेल. वाचा- रोहित नक्कीच ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. फक्त तो फिट असला पाहिजे असे गांगुलीने सांगितले. आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या गैरहजेरीत सध्या कायरॉन पोलार्ड संघाचे नेतृत्व करत आहे. मुंबईने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांची लढत पहिल्या क्वालीफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा फिट होईल आणि पुन्हा एकदा मैदानात दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेता गांगुलीने हे देखील सांगितले की, रोहित शर्माने आयपीएलमधील पुढील सामने खेळू नयेत. जेणे करून त्याची दुखापत वाढू नये. मी त्याला खेळताना पहिले नाही. फक्त रोहितच नाही तर जलद गोलंदाज इशांत शर्मा देखील दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. या दोघांच्या फिटनेसवर आम्ही नजर ठेवून आहोत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HPy4Px
No comments:
Post a Comment