
नवी दिल्ली: युएईमध्ये IPLचा १३वा हंगाम सुरू आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठीची सुरच अखेरच्या साखळी लढतीपर्यंत दिसत आहे. आयपीएलमध्ये सुपर ओव्हर आणि डबल सुपर ओव्हरच्या लढती देखील पाहायला मिळाल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात चुरशीची स्पर्धा ठरली आहे. कारण गुणतक्त्यातील अखेरच्या दोन संघांनी १२ गुण मिळवले आहेत. जगभरातील क्रिकेट चाहते आयपीएलचा आनंद घेत असताना अन्य काही देशात क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. वाचा- सध्या झिम्बाब्वेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे तर युरोपमध्ये देखील युरोपियन क्रिकेट सीरीज सुरू आहे. या स्पर्धेतील एक मजेशीर घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मध्ये पाकसेलोना सीसी आणि कॅटलुन्या टायगर्स () यांच्यात टी-१० लीग क्रिकेट सामना झाला. या सामन्यात असे काही झाली की क्रिकेट चाहते बघतच राहिले. कदाचित जागतिक क्रिकेटमध्ये अशी मॅच कधीच झाली नसले. वाचा- अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची गरज असताना दोन धावा घेतल्या गेल्या आणि सामना टाय झाला. आता तुम्हाला वाटेल यात असे विशेष काय घडले. तर त्याचे झाले असे की, या दोन धावा चेंडू विकेटकिपरच्या हातात असताना आणि तो विकेटकिपर विकेटच्या जवळ उभा असताना घेतल्या गेल्या. नेमक्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. वाचा- पाकसेलोनाला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची गरज होती. फलंदाजी करणाऱ्या अदलत अलीला शॉट मारता आली नाही आणि चेंडू विकेटकिपरच्या हातात गेला. पण तोपर्यंत त्यांनी एक धाव घेतली. विकेटकिपरने चेंडू थ्रो करण्याऐवजी ते फलंदाजाच्या क्रिझ जवळ आला. एवढ्यातच फलंदाजांनी चालाखी दाखवली धाव घेतली. त्यांनी दुसरी धाव देखील घेतली. ही धाव घेताना गोलंदाजीच्या क्रिझकडील फलंदाज धावात फलंदाजाच्या क्रिझकडे आला. दोन्ही फलंदाज एकाच क्रिझमध्ये असतान विकेटकिपरने चेंडू पिचच्या मध्ये उभ्या असलेल्या गोलंदाजाकडे दिला. पण त्याला चेंडू काही विकेटवर मारता आला नाही आणि दोन धावा घेण्यात यश आले. या दोन धावांमुळे सामना टाय झाला. वाचा- मैदानावरील हा प्रकार पाहून समालोचक देखील जोरजोरात हसू लागले. कॅटलान्या टायगर्सला गोल्डन बॉल नियमानुसार विजेता घोषित करण्यात आले. गोल्डन बॉल नियमाचा वापर युरोपियन क्रिकेट स्पर्धेत वापरला जात आहे. या नियमानुसार जर सामना टाय झाला तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संगाला एक अतिरिक्त चेंडू मिळतो. त्याच चेंडूवर त्यांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक धावा कराव्या लागतील. पाकसोलोना संघाला गोल्डन बॉलवर फक्त एक धाव घेता आली आणि कॅटलुन्या टायगर्सला विजय मिळाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3284J9O
No comments:
Post a Comment