नवी दिल्ली : भारताला १९८३ साली पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकवून देणारे भारताचे कर्णधार यांच्या निधनाच्या अफवा काल पासून सुरु झाल्या होत्या. सोशल मीडियावर तर काही जणांनी त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचेही पाहायला मिळाले होते. या सर्व प्रकारानंतर भारताच्या विश्वविजयी संघातील माजी खेळाडू मदन लाल यांगलेच भडकलेले आहे. कपिल यांच्या निधनाबाबतच्या अफवा बेजबाबदापणे केल्या होत्या. त्याचबरोबर या अफवा या असंवेदशनील होत्या, असे मदन लाल यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये नेमकं मदन लाल काय म्हणाले पाहा... मदन लाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " कपिल यांच्या प्रकृतीबाबत ज्या अफवा पसरल्या होत्या त्या बेजबाबदारपणे केल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर अफवा पसरवणाऱ्या लोकांना संवेदनशीलपणा नसल्याचेही पाहायला मिळाले. कपिल यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा होत आहे. दिवसेंदिवस कपिल यांची प्रकृती सुधारत आहे. या सर्व गोष्टींमुळे कपिल यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. कारण कपिल जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते, त्यावेळी त्यांचे कुटुंबिय प्रचंड दडपणाखाली होते. त्यामुळे कृपया करून कपिल यांच्याबाबत भाष्य करताना सर्वांनीच संवेदशनशीलपणे विचार करायला हवा." कपिल देव यांनी काही दिवसांपूर्वी एका व्हिडीच्या माध्यमातून सर्वांशी संपर्क साधला होता. त्यावेळी कपिल म्हणाले होते की, " सध्याच्या घडीला माझी प्रकृती चांगली आहे आणि त्यामध्ये सुधारणा होत आहे. १९८३ सालचा भारतीय संघ म्हणजे माझे कुटुंब होते. या कुटुंबियांशी भेटण्यासाठी मी आतूर झालेलो आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार." कपिल देव यांना आठवड्याभरापूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यानंतर कपिल यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत होते. पण गेल्या दोन दिवसांपासून कपिल यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर चांगलीच पसरलेली पाहायला मिळाली होती. या अफवानंतर आजी-माजी क्रिकेटपटू आणि कपिल यांचे चाहते चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mLNz9W
No comments:
Post a Comment