नवी दिल्ली: फॅन्टसी गेमशी जोडल्या गेलेल्या अर्थात MPLला पुढील तीन वर्षासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचे प्रायोजक म्हणून निवडण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ()च्या एका वरिष्ठ सदस्याने सोमवारी याची माहिती दिली. वाचा- बीसीसीआयने पोषाख प्रायोजकत्वासाठी एमपीएल सोबत करार केला आहे. भारतीय संघाच्या जर्सीवर सध्या असलेल्या नायकेची जागा एमपीएल घेईल. हे प्रायोजकत्व पुरुष, महिला, टीम ए आणि १९ वर्षाखालील संघांसाठी असेल. बीसीसीआयने या कराराला मंजूरी दिली आहे. वाचा- बीसीसीआयचे नुकसान भारतीय संघाच्या पोशाखासाठी प्रायोजक मिळाला असला तरी यात बीसीसीआयचे नुकसान झाले आहे. याआधी नायकेने प्रति सामन्यासाठी ८८ लाख इतकी रक्कम मोजली होती. ती आता कमी होऊन ६५ लाख इतकी झाली आहे. नायकेने २०१६ ते २०२० या पाच वर्षाच्या काळात करार केला होता. ज्यात ३० कोटींच्या रॉयल्टीसह ३७० कोटी रक्कम दिली गेली होती. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या आर्थिक स्थितीनुसार नायकेने दिलेली रक्कम देण्यास कोणी तयार नव्हेत. त्यामुळे नुकसानीसह बीसीसीआयने हा करार केला आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mKj1p4
No comments:
Post a Comment