अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर आता भारतीय संघासमोर एक अवघड आव्हान होते. हे आव्हान म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे होय. भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील २२७ धावांच्या पराभवानंतर सलग तीन सामन्यात विजय मिळवत मालिका तर ३-१ने जिंकलीच त्याच पाठोपाठ WTCच्या फायनलमध्ये प्रवेश केला. वाचा- वाचा- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात भारतीय संघ ७२.२ टक्क्यांसह अव्वल स्थानी पोहोचला. तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला त्यांची टक्केवारी ६१.४ टक्के इतकी राहिली. न्यूझीलंडचा संघ ७०.० टक्क्यांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा संघ ६९.२ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. जर इंग्लंडने चौथी कसोटी जिंकली असती तर ऑस्ट्रेलियाला फायनलचे तिकीट मिळाले असते. पण भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर पाणी फेरले. वाचा- वाचा- वाचा- आता भारतीय संघ क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ सर्वात यशस्वी ठरला. सर्व अर्थाने टीम इंडिया अव्वल ठरली. विजयाच्या टक्केवारीत, गुणांच्या बाबत भारत ५२० गुणांसह अव्वल राहिला. तर या स्पर्धेच्या कालावधीत भारताने सर्वाधिक १२ कसोटी सामने जिकंले, चार पराभव तर एक सामना ड्रॉ केला. सर्वाधिक विजयाबाबत इंग्लंडचा संघ ११ विजयासह दुसऱ्या स्थानावर ठरला. गुणांच्या बाबत देखील ४४२ गुणांसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत. पण आयसीसीने नियम बदलल्यामुळे ते चौथ्या स्थानावर घसरले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cbtQwN
No comments:
Post a Comment