अहमदाबाद: चौथ्या कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि २५ धावांनी पराभव करत भारतीय संघाने मालिका ३-१ जिंकली. या मालिका विजया बरोबर भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल ()मध्ये प्रवेश केला. भारताने WTCच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली. वाचा- भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चौथ्या कसोटीत ड्रॉ देखील पुरेसा होता. पण अक्षर पटेला आणि आर अश्विन यांच्या फिरकीच्या जोरवर भारताने शानदार विजय मिळवला. भारताच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे WTC फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. वाचा- वाचा- आता क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड ( ) यांच्यात फायनल मॅच होणार आहे. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत होणार असून, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. वाचा- इंग्लंडवरील विजयासह भारताने कसोटी क्रमवारीत देखील अव्वल स्थानी झेप घेतली. भारताने न्यूझीलंडला मागे टाकत अव्वल स्थान स्थान मिळवले. क्रमवारीत भारताचे १२२ गुण झालेत. तर न्यूझीलंड ११८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ekNh97
No comments:
Post a Comment