अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळून भारतीय संघाने मालिका ३-१ने जिंकली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिमयवर झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. वॉशिंग्टन सुंदरच्या शानदार नाबाद ९७ धावा आणि फिरकीपटूंची धमाकेदार कामगिरी लक्ष्यवेधी ठरली. दुसऱ्या डावात आणि यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्या. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ ने जिंकत भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. जूनमध्ये लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या फायनलमध्ये भारत विजेतेपदासाठी न्यूझीलंडविरुद्ध खेळले. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने कालच्या ७ बाद २९४ धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल मैदानावर होते. या दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून संघाला पहिल्या डावात १५०च्या पुढे आघाडी मिळून दिले. पटेल अर्धशतकाच्या आणि सुंदर शतकाच्या जवळ आला असता ही जोडी फुटली. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पटेल ४३ धावांवर बाद झाला. त्यानंतर इशांत शर्मा शून्यावर बाद झाला आणि त्याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला बाद करत बेन स्टोक्सने भारताचा ३६५ धावांवर ऑल आउट केला. यात सुंदरचे शतक फक्त चार धावांनी हुकले. ने १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह ५५.१७च्या स्ट्राइक रेटने नाबाद ९६ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. अश्विनने क्रॉली आणि जॉनी बेयरस्टोला बाद करत इंग्लंडची अवस्था २ बाद १० अशी केली. त्यानंतर अक्षर पटेलने डॉमनिक सिबलीला माघारी पाठवत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. तर अश्विनने पुन्हा एकदा बेन स्टोक्सला बकरा केले. त्याने स्टोक्सला शून्यावर माघारी पाठवत इंग्लंची अवस्था ४ बाद ३० अशी केली. पाचव्या विकेटसाठी जो रूट आणि ओली पोप हे दोघे काही काळ पिचवर टिकले. दोघांना ३५ धावा करता आल्या. पोपला अक्षरने १५ धावांवर बाद केले. त्याच्या पुढील ओव्हरमध्ये अश्विनने कर्णधार जो रूटला बाद केले आणि भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. रुटने ३० दावा केल्या. तो बाद झाला तेव्हा इंग्लंडची अवस्था ६ बाद ६५ अशी झाली होती. त्यानंतर सातव्या विकेटसाठी बेन फोक्स आणि लॉरेंन्स यांनी ४३ धावांची भागिदारी केली. ही जोडी अक्षरने फोडली. स्लीपमध्ये अजिंक्यने एक शानदार कॅच घेत फोक्सला माघारी पाठवले. डोमिनिक बेसला बाद करत अक्षरने इंग्लंडची आठवी विकेट घेतली. दरम्यान लॉरेंन्सने कसोटीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. अश्विनने जॅक लीचला बाद करत इंग्लंडची नववी विकेट घेतली. अजिंक्य रहाणेचा पुन्हा एकदा शानदार कॅच घेतला. चार सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यानंतर भारतीय संघाने धमाकेदार कमबॅक केले. चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत मोठा विजय साकारला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर अहमदाबाद येथील डे-नाइट कसोटीत इंग्लंडचा दुसऱ्या दिवशी पराभव करत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर आज चौथ्या कसोटीत विजय मिळवून या दौऱ्यातील पहिल्या मालिकेत विजय मिळवला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qk8yC8
No comments:
Post a Comment