अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने ४ सामन्यांची क्रिकेट मालिका ३-१ने जिंकली. भारताच्या या मालिका विजयात सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरला तो होय. अश्विनने या मालिकेत १८९ धावा केल्या आणि ३२ विकेट घेण्याचा पराक्रम केला. वाचा- अश्विनच्या या शानदार ऑल राउंड कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. चार सामन्यांच्या कसोटीत ३० पेक्षा अधिक विकेट दोन वेळा घेणार तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी २०१५ साली दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध त्याने चार सामन्यांच्या मालिकेत ३१ विकेट घेतल्या होत्या. भारताकडून बिशन सिंह बेदी, हरभजन सिंग, बीएस चंद्रशेखर आणि कपिल देव यांनी कसोटी मालिकेत अशी कामगिरी केली होती. पाहा अश्विन काय म्हणाला... वाचा- ... या मालिकेत अश्विनने तिसऱ्या कसोटीत जोफ्रा आर्चरची विकेट गेत ४००वी कसोटी विकेट मिळवली होती. ४०० विकेट घेणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला होता. या मालिकेतील दमदार कामगिरीचा पुरस्कार देखील त्याला मिळाला. गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. वाचा- चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताकडून अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्या. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्या. त्यानंतर पंतचे शतक आणि सुंदरच्या नाबाद ९६ धावांच्या जोरावर भारताने १६० धावांची आघाडी घेतली. या आघाडीनंतर टीम इंडियाने इंग्लंडचा दुसरा डाव फक्त १३५ धावात गुंडाळला आणि एक डाव २५ धावांनी विजय मिळवला. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bkwRLO
No comments:
Post a Comment