नवी दिल्ली : सर व्हिव्हियन रिचडर्स, रिची रिचर्ड्सन, जिम्मी एडन्स आणि रामनरेश सर्वान या क्रिकेटपटूंची ओळख स्वंतत्रपणे सांगण्याची गरज नाही. क्रिकेटमध्ये यांनी केलेल्या कामगिरीची आठवण आज देखील सर्वांच्या लक्षात आहे. क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या वेस्ट इंडिजच्या या सर्व माजी क्रिकेटपटूंनी भारताचे पंतप्रधान यांचे आभार मानले आहेत. वाचा- भारताने गेल्या काही महिन्यांपासून जगातील अनेक देशांना करोनाविरुद्धची लस भेट म्हणून दिली आहे. भारताने काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजला करोनाची लस दिली होती. या भेटीबद्दल वेस्ट इंडिजच्या या दिग्गज क्रिकेटपटूंनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. वाचा- मी एटीगुआ आणि बारबाडोसमधील लोकांच्यावतीने भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी करोनाची लस आम्हाला दिली. यामुळे आपले नाते आणि मजबूत होतील. वाचा- गयानाच्या जॉर्ज टाऊन येथील भारतीय उच्चायोगाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. वेस्ट इंडिज संघाचे माजी कर्णधार रिची रिचर्ड्सन यांनी देखील पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. वाचा- एटीगुआ आणि बारबाडोस सरकारच्या वतीने आणि जनतेकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करू इच्छीतो. भारताने आम्हाला कोरनाची ४० हजार लस पाठवल्या. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर जिमी एडम्स यांनी देखील भारत सरकारने दिलेल्या या मदतीसाठी आभार मानले आहेत. हे महान पाऊल उचलल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो. भारताने फक्त कॅरेबिनय देशांना नाही तर अन्य अनेक देशांना करोनाची लस पाठवली आहे. ही लस फार प्रभावी आहे. माजी क्रिकेटपटू रामनरेश सर्वान याने देखील लस दिल्याबद्दल आभार मानले आहेत. वाचा- काही दिवसांपूर्वी देशातील लोकांना अद्याप लस दिली केली नाही आणि भारत अन्य देशांना लस पाठवत आहे याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला फटकारले होते. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bL9ZFp
No comments:
Post a Comment