मुंबई : इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघासाठी रविवारी झालेल्या सामन्यात पदार्पण केले. पण त्यानंतर आता मुंबई इंडियन्सची चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आता इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना मुंबई इंडियन्सला आपल्या संघात कायम (रिटेन) ठेवता येणार नाही. या गोष्टीचे नेमके कारण आहे तरी काय, पाहा... इशान किशनने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावत मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याचबरोबर सूर्यकुमारनेही रविवारच्या सामन्यात पदार्पण केले, पण त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. या दोघांचेही भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न सत्यात उतरले, ही दोघांसाठी आनंदाची गोष्ट आहे. पण या गोष्टीमुळे आता मुंबई इंडियन्सच्या चिंतेत भर ठेवली आहे. कारण आयपीएलच्या नियमांनुसार आता मुंबई इंडियन्सला इशान आणि सूर्यकुमार यांना संघात कायम ठेवता येणार नाही. जाणून घ्या, काय आहे आयपीएलचा नियम पुढच्या वर्षी आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. त्याचबरोबर पुढच्या वर्षीपासून आयपीएलमध्ये अजून दोन संघ नव्याने जोडले जाणार असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्ससाठी इशान आणि सूर्यकुमार यांना संघात कायम ठेवणे कठिण होणार आहे. कारण आयपीएलचे खेळाडूंच्या रिटेशनबाबत काही नियम आहेत. एक संघ फक्त तीन भारतीय संघातील तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना रिटेन करु शकतो. त्याचबरोबर राइट टु मॅच कार्डच्या जोरावर त्यांना एक विदेशी आणि एक अनकॅप खेळाडूला संघात रिटेन करता येऊ शकते. त्यामुळे यापुढे मुंबई इंडियन्सला इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना रिटेन करणे सोपे नसेल. कारण मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यांना पसंती देऊ शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्सने या तिघांना रिटेन करायचे ठरवले तर त्यानंतर इशान आणि सूर्यकुमार यांना लिलावात सहभागी व्हावे लागेल. त्यामुळे इशान आणि सूर्यकुमार यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर मुंबई इंडियन्सची चिंता वाढली असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38F7jaH
No comments:
Post a Comment