अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भारताचा पराभव झाला होता. या पहिल्या लढतीच्या काही तास आधी दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्यानंतर चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटीत अक्षरने पदार्पण केले आणि त्यानंतर जे झाले त्याची नोंद फक्त भारतीय नव्हे तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहली जाणार आहे. वाचा- अक्षरने पुढील तीन कसोटी सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. जागतीक क्रिकेटमध्ये त्याचे पदार्पण स्टार प्रमाणे झाले. त्याने ३ सामन्यात इतक्या विकेट घेतल्या की वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. वाचा- वाचा- इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यात अक्षरने इतक्या विकेट घेतल्या की पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अक्षरने स्वत:च्या नावावर केला. अक्षरने ३ सामन्यातील ६ डावात २७ विकेट घेतल्या. एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाण्याचा दिलीप दोषी यांच्या विक्रमाशी अक्षरने बरोबरी केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९७९ साली ६ कसोटी मालिकेत ही कामगिरी केली. पण अक्षरने फक्त ३ कसोटीत त्यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. वाचा- अक्षरने पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा अजंता मेंडिस याचा २६ विकेटचा विक्रम मागे टाकला. मेंडिसने भारताविरुद्ध २६ विकेट घेतल्या होत्या. पदार्पणात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज (३ पेक्षा अधिक सामने) अक्षर पटेल- २७ विकेट अजंता मेंडिस- २६ विकेट एलेक बेड्सर- २४ विकेट आर अश्वि- २२ विकेट स्टुअर्ट क्लार्क- २० विकेट वाचा- चौथ्या कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि २५ धावांनी पराभव करत भारतीय संघाने मालिका ३-१ जिंकली. या मालिका विजया बरोबर भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (world test championship final)मध्ये प्रवेश केला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bk4n4L
No comments:
Post a Comment