अहमदाबाद, : इंग्लंडच्या सलामीवीराला आयपीएलच्या लिलावात कोणीच वाली मिळाला नव्हता. लिलावात त्याच्यावर कोणीच बोली लावायला तयार नव्हते. पण भारताच्या गोलंदाजाची त्याने पहिल्याच सामन्यात धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडने पहिल्या सामन्यात भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना आठ षटकांमध्ये ७२ धावांचा डोंगर रचला. यामध्ये सर्वात मोलाचा वाटा होता तो सलामीवीर जेसन रॉयचा. कारण जेसनने या सामन्यात भारतीय गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली आणइ ३२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ४९ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. पण अर्धशतकाला एक धाव हवी असताना रॉय वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला होता. पण बाद होण्यापूर्वी रॉयने संघासाठी महत्वाची खेळी साकारली होती. यावर्षी झालेल्या आयपीएलच्या लिलावात रॉयवर कोणीही बोली लावली नव्हती. त्यानंतर रॉय निराश झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर रॉयने एक ट्विटही केले होते. या ट्विटमध्ये रॉयने म्हटले होते की, " यावर्षीच्या आयपीएलमध्ये मला संधी मिळाली नाही, याचे नक्कीच वाईट वाटत आहे. पण ज्यांच्यावर पैशांचा वर्षाव झाला त्यांचे मी अभिनंदन करतो." रॉयचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. भारताला पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली, पण श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला इंग्लंडने १२५ धावांचे आव्हान ठेवता आले होते. पण इंग्लंडने दमदार सलामीच्या जोरावर हे आव्हान लिलया पेलले आणि आठ विकेट्स राखून विजय साकारला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भेदक गोलंदाजी केल्यानंतर धमाकेदार फलंदाजी केली आणि पहिल्या सामन्यात सहजपणे विजय मिळवला. भारताच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या पॉवर प्लेमध्ये अर्धशतक झळकावत झोकात सुरुवात केली. पण त्यांना पहिल्या पॉवर प्ले नंतर पहिला धक्का बसला. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने यावेळी इंग्लंडच्या जोस बटलरला बाद केले. बटलरने यावेळी २८ धावांचे योगदान दिले. बटलर बाद झाला असला तरी जेसन रॉय मात्र भारताच्या गोलंदाजांचा चांगालाच समाचार घेत असल्याचे पाहायला मिळाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eBnsSm
No comments:
Post a Comment