अहमदाबाद, : इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत रोहित शर्माला अजून खेळण्याची संधी मिळाली नाही. पण रोहित शर्मा या मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद भुषवताना पाहायला मिळू शकतो. तुम्हाला ही गोष्ट खरी वाटणार नाही, पण ही गोष्ट चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात होऊ शकते, असे म्हटले जात आहे. रोहित शर्माला आतापर्यंत दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांत संधी दिली नाही. तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही रोहितला संधी मिळेल, असे वाटत नाही. पण चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मात्र रोहितला संधी मिळेल आणि तो यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद भुषवेल, असे म्हटले जात आहे. कारण चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. रोहित कर्णधार झाल्यावर कसा असे फलंदाजीचा क्रम, पाहा... रोहित शर्मा कर्णधार झाल्यावर लोकेश राहुलला संघात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण रोहित संघात आल्यावर सलामीलाच खेळणार आहे. यावेळी रोहितबरोबर सलामीला इशान किशन येऊ शकतो. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानावर सूर्यकुमार यादवला बढती दिली जाऊ शकते. त्याचबरोबर चौथ्या क्रमाकांवर धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत असू शकतो. त्यानंतर पाचव्या क्रमाकांवर श्रेयस अय्यरला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित शर्माला संधी मिळणार नसल्याचे दिसत आहे. कारण पहिल्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये लोकेश राहुल हा अपयशी ठरला आहे. राहुलला अजून एक संधी कोहली देऊ शकतो. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही रोहित भारतीय संघाकडून खेळताना दिसला नाही तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. रोहित आणि इशान हे दोघेही मुंबई इंडियन्सकडून खेळत असले तरी त्यांना आतापर्यंत सलामी केल्याचे पाहायला मिळाले नाही. कारण मुंबई इंडियन्सकडून खेळताना रोहित क्विंटन डीकॉकबरोबर सलामीला सहसा येत असतो. पण आता इशान चांगल्या फॉर्मात आहे आणि पहिल्याच सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कारही पटकावला आहे. इशानने सामनावीर पुरस्कार एका खास व्यक्तीला समर्पित केला. इशांतने त्याच्या प्रशिक्षकांच्या वडिलांना समर्पित केला. त्याचे काही दिवासंपूर्वी निधन झाले होते आणि माझी आजची खेळी ही त्यांच्यासाठी होती असे इशान म्हणाला. सामन्याआधी प्रशिक्षक म्हणाले होते की, "माझ्या वडिलांसाठी तुला किमान अर्धशतक करावे लागले. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. इशानच्या या कृतीने सर्व क्रिकेट चाहत्याचे मन जिंकले."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lke4U9
No comments:
Post a Comment