अहमदाबाद, : इशान किशनने पदार्पणाच्या सामन्यातच धमाल उडवून दिली. आपल्या पहिल्याच सामन्यात बिनधास्त फटकेबाजी करत इशानने अर्धशतक झळकावले. पण इशान या सामन्यापूर्वी रोहित शर्माने एक खास सल्ला दिला होता. हा सल्ला आपल्याला फार उपयोगी पडला, असे इशाननेच सांगितले आहे. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत इशान म्हणाला की, " सामन्यापूर्वी रोहित शर्माला मला एक खास सल्ला दिला आणि त्याचा मला चांगलाच फायदा झाला. रोहित मला म्हणाला होता की, तु आता सलामीला जात आहे, पण जास्त दडपण घेऊ नको. तु आयपीएलमध्ये जसा बिनधास्त खेळतो तशीच फलंदाजी कर, जास्त कसलेच दडपण घेऊ नको. रोहितचा हा सल्ला मला चांगलाच उपयोगी ठरला. कारण त्यामुळे माझ्यावरचे दडपण कमी झाले आणि मी चांगली फलंदाजी करु शकलो." इशानने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजयाचा पाया रचला. इशानने विराट कोहली सोबत फक्त ५६ चेंडूत ९४ धावांची भागिदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने ३२ चेंडूत धमाकेदार ५६ धावा करत सामनावीर पुरस्कार पटकावला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक करणारा तो दुसरा भारतीय ठरला. भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या इशानने फक्त देशाला विजय मिळवून दिला नाही तर एक अशी कृती केली ज्याने सर्व चाहत्यांचे मन जिंकले. इंग्लंडविरुद्ध भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद ७३ धावा केल्या. सामनावीर पुरस्कार त्याला मिळेल असे वाटले होते. पण पदार्पणात शानदार शतक करून संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या इशांतची निवड या पुरस्कारासाठी केली गेली. पदार्पणात सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो सातवा भारतीय ठरला. इशानने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावत मिळालेल्या संधीचे सोने करुन दाखवले. इशानने भारतीय संघात निवड झाल्यानंतर स्वत:ला सिद्ध करून दाखवले. त्याने देशाला विजय मिळवून दिला. तो एवढ्यावर थांबला नाही. सामनावीर पुरस्कार एका खास व्यक्तीला समर्पित केला. इशांतने त्याच्या प्रशिक्षकांच्या वडिलांना समर्पित केला. त्याचे काही दिवासंपूर्वी निधन झाले होते आणि माझी आजची खेळी ही त्यांच्यासाठी होती असे इशान म्हणाला. सामन्याआधी प्रशिक्षक म्हणाले होते की, "माझ्या वडिलांसाठी तुला किमान अर्धशतक करावे लागले. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. इशानच्या या कृतीने सर्व क्रिकेट चाहत्याचे मन जिंकले. सोशल मीडियावर त्याच्या या कृतीचे सर्वजण कौतुक करत आहेत."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rSxUs8
No comments:
Post a Comment