अहमदाबाद, : तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. कारण यावेळी संघाची निवड करताना दोन्ही सामन्यांत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला संधी देण्यात आली. पण फलंदाजीची संधीही न मिळालेल्या सूर्यकुमार यादवला मात्र संघातून बाहेर काढण्यात आले. तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित शर्माला संधी देण्यात आली नसल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहितला पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे, असे वक्तव्य कर्णधार विराट कोहलीने केले होते. त्यानुसार पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळवण्यात आले नाही. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात तो खेळणार का, याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण यावेळी रोहितला संघात स्थान मिळाल्यावर राहुलला डच्चू मिळेल, असे वाटत होते. पण तसे झालेले पाहायला मिळालेले नाही. पहिल्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांत राहुल सातत्याने अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याला वगळण्यात येईल, असे वाटत होते. पण यावेळी कोहलीने संघ जाहीर करताना रोहितला संधी देताना सूर्यकुमारला वगळल्याचे सांगितले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण यादवला आतापर्यंत फलंदाजी करण्याचीही संधी मिळाली नव्हती. त्यामुळे भारतीय संघात नेमके काय चालले आहे, हे चाहत्यांना समजत नसल्याचे दिसत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OBdENr
No comments:
Post a Comment