अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासाठी ही लढत महत्त्वाची आहे. या मॅचच्या निकालावर भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील स्थान निश्चित होणार आहे. live अपडेट ( 4th Test day 1 ) >> पहिल्या सत्राचा खेळ संपला, इंग्लंड ३ बाद ७४ (बेयरस्टो आणि स्टोक्स मैदानावर) >> रुट ५ धावांवर बाद, इंग्लंड ३ बाद ३० >> इंग्लंडचा कर्णधार जो रूट बाद, सिराजने घेतली मोठी विकेट >> इंग्लंडची आणखी एक विकेट, अक्षरने क्रॉलीला बाद केले- इंग्लंड २ बाद १५ >> डॉम सिबली २ धावांवर बाद, इंग्लंड १ बाद १० >> अक्षर पटेलचा धमाका, पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर घेतली विकेट >> भारताने पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर DRS रिव्ह्यू गमावला >> इंग्लंडच्या पहिल्या डावाला सुरूवात असे आहेत दोन्ही संघ >> भारतीय संघात एक बादल- जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश >> इंग्लंडच्या संघात दोन बदल >> वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियासाठी ही कसोटी महत्त्वाची >> चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ने आघाडीवर >> भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30d7Lbi
No comments:
Post a Comment