एंटिगा: वेस्ट इंडिजचा कर्णधार ()ने गुरुवारी भारताचा युवराज सिंग आणि हर्शल गिब्स यांच्या यादीत स्थान मिळवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम पोलार्डने केलाय. अशी कामगिरी करणारा तो पहिला वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. वाचा- वेस्ट इंडिज आणि श्रीलंका () यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात लंकेचा गोलंदाज अकीला धनंजय याच्या ओव्हरमध्ये त्याने ही कामगिरी केली. विशेष म्हणजे या सामन्या धनंजयने हॅटट्रिक देखील केली. त्याने इविन लुईस, ख्रिस गेल आणि निकोलस पूरन यांची विकेट घेत हॅटट्रिक घेतली. वाचा- धनंजयने चार ओव्हरमध्ये ६२ धावा केल्या. या सामन्यात वेस्ट इंडिजने ४१ चेंडू आणि ४ विकेट राखून विजय मिळवला. पोलार्डने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेला २० षटकात १३१ धावा करता आल्या. वाचा- वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या युवराज सिंगने १९ सप्टेंबर २००७ रोजी पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते. दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने वनडे वर्ल्डकपमध्ये नेदरलँडविरुद्ध डान बंग याच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uR0End
No comments:
Post a Comment