अहमदाबाद: ( ) गेल्या चार आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन लढतीत त्याने फक्त एक धाव केली आहे. राहुलच्या खराब कामगिरीमुळे आता संघातील त्याच्या स्थानावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. काल (मंगळवार) इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा आठ विकेटनी पराभव झाला. या सामन्यात राहुलला भोपळा फोडता आला नाही. सामना झाल्यानंतर राहुलच्या अपयशाबद्दल विचारले असता राहुलने तो चॅम्पियन प्लेयर असल्याचे सांगितले. टी-२० मध्ये रोहित शर्मा सोबत डावाची सुरूवात करण्यासाठी त्याचा प्राधान्य देणार असल्याचे विराटने स्पष्ट केले. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या तीन लढतीत राहुलने १,०,० अशा धावा केल्या आहेत. पहिल्या दोन लढतीत अपयशी ठरल्यानंतर तिसऱ्या लढतीत राहुल ऐवजी रोहित शर्माला संघात स्थान दिले जाईल असे वाटले होते. पण राहुलला संघात ठेवण्यासाठी सूर्यकुमार यादवला वगळण्यात आले. दुसऱ्या लढतीत सलामीला येत शानदार अर्धशतक करणाऱ्या इशान किशनला दुसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. राहुलसाठी इतका बदल करून देखील तो शून्यावर बाद झाला. मी देखील दोन दिवसांपूर्वी खराब फॉर्ममध्ये होतो. राहुल एक चॅम्पियन खेळाडू आहे. तो टॉप ऑर्डरमध्ये रोहित सोबत आमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. या क्रिकेटमध्ये चार-पाच चेंडूचा प्रश्न असतो, असे विराट त्याला म्हणाला. वाचा- गेल्या काही दिवसात विराट कोहलीला धावा करता आल्या नव्हत्या. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर पहिल्या टी-२० देखील तो शून्यावर माघारी परतला. पण पुढील दोन सामन्यात त्याने नाबाद ७३ आणि ७७ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eONnWO
No comments:
Post a Comment