Ads

Wednesday, March 10, 2021

​भारतीय संघाला बसला मोठा झटका; दोन महत्त्वाचे खेळाडू झाले संघाबाहेर

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड () यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका १२ मार्चपासून सुरू होणार आहे. कसोटी मालिकेत ३-१ विजय मिळवलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. पण टी-२० मालिकेआधी टीम इंडियाला एक मोठा झटका बसलाय. भारतीय संघात निवड करण्यात आलेला फिरकीपटू () सलग दुसऱ्यांदा फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरलाय. यामुळे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून तो बाहेर झाला आहे. फक्त वरूण नाही तर जलद गोलंदाज देखील दुखापतीमुळे मालिकेतील पहिल्या काही सामन्यात खेळण्याची शक्यता नाही. वाचा- बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो नापास झाला. वरुण सलग दुसऱ्यांदा फिटनेस टेस्ट पास करण्यात अपयशी ठरला आहे. तर यॉर्कर किंग अशी ओळख असलेल्या नटराजनच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो सध्या तरी संघासोबत असणार नाही. वरुणने गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली होती. पण दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला. आता इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो नापास झाला होता. आता पुन्हा तो अपयशी ठरला. वरुण दोन वेळा यो-यो टेस्टमध्ये नापास झाला. यात त्याला दोन किलोमीटर धावायचे होते. वाचा- टी नटराजनने देखील आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारतीय संघात संधी मिळाली. अन्य खेळाडूंच्या दुखापतीमुळे नटराजनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे, कसोटी आणि टी-२० प्रकारात पदार्पण करण्याची संधी मिळाली. आता इंग्लंडविरुद्ध त्याला संधी देण्यात आली होती. वरुणच्या निवडीबाबत आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अशा खेळाडूची निवड का केली ज्याने ऑक्टोबरपासून राज्य संघाकडून कोणतीही मॅच खेळली नाही. वाचा- मुश्ताक अली टी-२० स्पर्धा सुरू असताना तो रिहॅबिलिटेशनमध्ये होता. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीत देखील तो एकही सामना खेळू शकला नाही. पाच महिन्यापूर्वी खेळलेल्या मॅचच्या आधारावर त्याची फिटनेस कशी काय निश्चित केली जाऊ शकेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरुणची निवड निवड समितीसाठी एक धडा असेल. वाचा- जर एखाद्या खेळाडूने भारतीय संघाच्या निवडीसाठीचे मापदंड पूर्ण केले नाही तर फक्त गोलंदाजीच्या आधारावर त्याची संघात निवड करता येणार नाही. नटराजनच्या फिटनेसवर काम सुरू आहे. टी-२० मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यात तो खेळण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. टी-२० नंतर पुण्यात वनडे सामने होणार आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3etyYPo

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...