नवी दिल्ली: युएईत सुरू असलेल्या आयपीएलच्या २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने संघाचा उप कर्णधार पार्थिव पटेल याला वगळले आणि पहिल्या सामन्यात सलामीवीर म्हणून याला संधी दिली. पडिक्कलने संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावेल. त्यानंतर देवदत्तने अनेक शानदार खेळी केल्या. काल सोमवारी झालेल्या अखेरच्या साखळी लढतीत अर्धशतक करून एक नवा विक्रम त्याने स्वत:च्या नावावर केला. वाचा- देवदत्त पडिक्कलने आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक वेळा अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. जो एक अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहे. देवदत्तने आतापर्यंत पाच अर्धशतक केली आहेत. यासह त्याने शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांना मागे टाकले आहे. २००८ साली शिखरने दिल्लीकडून ४ अर्धशतक केली होती. तेव्हा त्याने भारतीय संघाकडून पदार्पण केले नव्हते. तर २०१५ साली श्रेयसने चार अर्धशतक केली होती. आता देवदत्तने पाच अर्धशतक करत या दोघांचा विक्रम मागे टाकला. वाचा- या तिघांनी अशा वेळी आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा अर्धशतक केली आहेत जेव्हा त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. देवदत्तने दिल्लीविरुद्धच्या लढतीत ४० चेंडूत ५० धावा केल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या देवदत्तला २०२० साठी बेंगळुरूने विकत घेतले होते. १४ सामन्यात त्याने ४७२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १२६.५४ इतका आहे तर ५१ चौकार मारले आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HYWWE9
No comments:
Post a Comment