दुबई : चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर शेन वॉटसनने आज आपली आयपीएलमधील निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आता चेन्नईला एकामागून एक धक्के बसतील, असे चर्चा सध्याच्या घडीला सुरु आहे. पण पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये दोन भारतीय खेळाडूंनाही डच्चू मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण या हंगामात या दोन्ही चेन्नईच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी चेन्नईच्या संघात हे दोन भारतीय खेळाडू नसतील, अशी चर्चा आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नईकडून सर्वात जास्त निराशा केली ती महाराष्ट्राच्या केदार जाधवने. कारण केदारला यावेळी चेन्नईच्या संघाने पुरेशी संधी दिली. पण जेव्हा जबाबदारीने फलंदाजी करण्याची वेळ आली तेव्हा केदार त्यामध्ये अपयशी पडल्याचे पाहायला मिळाले. यावर्षीच्या आयपीएलमध्ये केदारने ६६ चेंडूंत ६२ धावा केल्या. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ही कामगिरी नक्कीच चांगली नाही. त्यामुळेच केदारला चेन्नईच्या संघाने वगळण्याचा निर्णय घेतला होता. या आयपीएलमध्ये केदारला आठ सामन्यांमध्ये संधी दिली, पण त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी एकदाही करता आली नाही. त्यामुळेच केदारला सहा सामन्यांमध्ये संघाबाहेर ठेवण्यात आले होते.केदारला २०१८ साली झालेल्या लिलावात चेन्नईच्या संघाने ७.८० कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले होते. पण या मोसमात केदारला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच चेन्नईच्या संघ त्याला कायम ठेवणार नाही, असे म्हटले जात आहे. चेन्नई दुसऱ्या एका भारतीय खेळाडूला डच्चू देऊ शकते आणि तो खेळाडू असू शकतो पीयुष चावला. चेन्नईच्या संघाने ६.७५ कोटी रुपये पीयुषला आपल्या संघात स्थान दिले होते. पण या आयपीएलमध्ये चावलाला सात सामन्यांमध्ये फक्त सहा बळीच मिळवता आले. त्याचबरोबर ९.०९ हा त्याचा इकॉनॉमी रेट होता. त्यामुळे या मोसमात चावला चांगलाच महागडा गोलंदाज ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नईच्या संघाने चावलाला सात सामन्यांमध्ये संघाबाहेर ठेवले होते. त्यामुळे यापुढे जर चेन्नईला नव्याने संघबांधणी करायची असेल तर त्यामध्ये चावलाला स्थान मिळू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर एवढी जास्त किंमत मोजत त्याला चेन्नई संघात ठेवेल, असेही वाटत नाही. त्याचबरोबर चावलाचे वय हा देखील एक महत्वाचा विषय ठरू शकतो. त्यामुळे पुढच्या आयपीएलमध्ये आपल्याला चावला चेन्नईच्या संघात दिसला नाही तर नवल वाटायला नको. त्यामुळे पुढच्या वर्षी चेन्नईच्या संघात नेमके कोण खेळाडू असतील, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TIY0yj
No comments:
Post a Comment