दुबई : आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर प्ले-ऑफचे चित्र आता स्पष्ट झालेले पाहायला मिळत आहे. आता प्ले-ऑफमध्ये कोणत्या संघांचे सामने कोणाबरोबर आणि कधी होतील, पाहा... प्ले-ऑफमध्ये पहिला सामना क्वालिफायर-१ हा होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ भिडतील. हा सामना दुबई येथे गुरुवारी रात्री साडे सात वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत जाईल. पण जो संघ पराभूत होईल त्यांनाही एक संधी मिळणार आहे. या क्वालिफायर-१ सामन्यात पराभूत झालेला संघ क्वालिफायर-२ या सामन्यात खेळेल. या सामन्यात जर हा संघ विजयी ठरला तर त्यांना आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल. हैदराबादने आजच्या सामन्यात विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. प्ले-ऑफमध्ये एलिमिनेटर या सामन्यात त्यांना आरसीबीबरोबर दोन हात करावे लागतील. हा सामना ६ नोव्हेंबरला आबुधाबीच्या मैदानात खेळवला जाईल. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्याला संघाला क्वालिफायर-२ या सामन्यात स्थान मिळेल. एलिमिनेटरमधील विजेता संघ क्वालिफायर-२मध्ये दाखल होतील. या सामन्यात विजेत्या संघाला क्वालिफायर-१ सामन्यातील पराभूत संघाशी यावेळी दोन हात करावे लागतीत. हा सामना आठ नोव्हेंबरला आबुधाबीच्या मैदानात होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल, त्या संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल. या आयपीएलचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला दुबईच्या मैदानात होणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची पुरती दाणादाण उडवली. वॉर्नर आणि साहा या दोघांनी अर्धशतके झळकावत मुंबईच्या गोलंदाजांना आपल्या समोर नतमस्तक व्हायला बाद पाडले. या दोघांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने मुंबईवर १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता प्ले-ऑफमध्ये हैदराबादचा सामना आरसीबीच्या संघाबरोबर होणार आहे. वॉर्नरने यावेळी ५८ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८५ धावांची तुफानी खेळी साकारली. साहाने यावेळी वॉर्नरला चांगली साथ देत ४५ चेंडूंत सात चौकार आण् एका षटकारासह नाबाद ५८ धावा फटकावल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jROsM3
No comments:
Post a Comment