Ads

Monday, November 2, 2020

IPL 2020 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली क्वालिफायर्समध्ये भिडणार, पाहा गुणतालिकेतील बदल...

आबुधाबी : दिल्ली कॅपिटल्सने आजच्या निर्णायक सामन्यात आरसीबीवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर दिल्लीने दोन गुणांची कमाई केली आहे. पण या सामन्यानंतर गुणतालिकेत नेमका काय बदल झाला आहे, पाहा... या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ हा तिसऱ्या स्थानावर विराजमान होता. या लढतीपूर्वी दिल्लीच्या संघाने १३ सामने खेळले होते. या १३ सामन्यांमध्ये त्यांनी सात विजय मिळवले होते, तर सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण आजच्या सामन्यात त्यांनी आरसीबीचा पराभव केला. या विजयासह दिल्लीने दोन गुणांची कमाई केली. या दोन गुणांसह दिल्लीने गुणतालिकेत आरसीबीला धक्का देत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता दिल्लीचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर क्वालिफायर्स-१मध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीचा संघ हा दुसऱ्या स्थानावर विराजमान होता. या लढतीपूर्वी आरसीबीच्या संघाने १३ सामने खेळले होते. या १३ सामन्यांमध्ये त्यांनी सात विजय मिळवले होते, तर सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण आजच्या सामन्यात आरसीबीला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या सामन्यानंतर आरसीबीचे १४ गुणच राहीले आहेत. पण तरीही आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. या पराभवानंतरही आरसीबीचा संघ तिसरे स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीच्या संघावर दमदार विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने आपले प्ले-ऑफमधील स्थान पक्के केले आहे. आरसीबीने या सामन्यात दिल्लीपुढे १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीने अजिंक्य आणि धवन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान लीलया पार करत सहा विकेट्स राखून विजय मिळवला. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये अजिंक्यला चांगल्या धावा करता आल्या नव्हत्या, पण तरीही आजच्या सामन्यात अजिंक्यला संधी देण्यात आली होती. अजिंक्य यावेळी फलंदाजी करताना सकारात्मक दिसला. त्यामुळेच अजिंक्य आणि सलामीवीर शिखर धवन यांची यावेळी चांगली भागीदारी पाहायला मिळाली. या दोघांनी एकेरी-दुहेरी धावसंख्येवर भर दिलाच, पण वाईट चेंडूवर मोठे फटके मारालाही हे दोघे विसरले नाहीत. अजिंक्य आणि धवन यांनी यावेळी दमदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. शिखर धवनने यावेळी चौकारासह आपले अर्धशतकही साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर धवन जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. धवनला यावेळी आरसीबीचा युवा फिरकीपटू शाहबाज अहमदने बाद केले. धवनने यावेळी ४१ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर ५४ धावांची खेळी साकारली. अजिंक्यने यावेळी अर्धशतक झळकावले खरे, पण संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब त्याला करता आले नाही. अजिंक्यने यावेळी ४६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६० धावांची खेळी साकारली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/383G61L

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...