नवी दिल्ली: आयपीएलचा १३वा हंगाम अखेरच्या टप्प्या आला आहे. प्रत्येक सामन्यात प्ले ऑफसाठीची समीकरणे बदलत आहेत. सर्व संघांनी खेळाडूंना मोठी किमत देवून विकत घेतले आहे. अशा खेळाडूची कामगिरी कशी होते यावर सर्वांचे लक्ष आहे. वाचा- या वर्षी आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. पण असे काही खेळाडू देखील आहेत ज्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात त्यांनी खराब कामगिरी केली. भारताला १९ वर्षाखालील वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळून देणाऱ्या () ने सुरुवातीच्या काही सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. पण त्यानंतर मात्र तो बेजबाबदारपणे बाद होत गेला. गेल्या ६ सामन्यात १९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. काल शनिवारी मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात तो १० धावांवर बाद झाला. वाचा- अशीच अवस्था विकेटकीपर () ची आहे. त्याला देखील फलंदाजीत आणि विकेटकिपिंगमध्ये फार चमक दाखवता आली नाही. या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर बोलताना भारताचे महान फलंदाज () म्हणाले, पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत या दोघांना लोक लक्षात ठेवतील ते त्यांच्या मैदानावरील कामगिरीमुळे. त्यांनी मोठ्या गाड्यांसोबत फोटो काढण्यापेक्षा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगसोबत वेळ घालवला तर फायदा होईल. पॉन्टिंग एक मोठा खेळाडू आहे. वाचा- आयपीएलच्या निमित्ताने भारताच्या अनेक युवा खेळाडूंना जगातील दिग्गज खेळाडूंसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. त्याची तयारी आणि सल्ला घेता येतो. फक्त शारिरिक नाही तर मानसिक पातळीवर याचा फायदा होतो, असे गावस्कर म्हणाले. यशस्वी जयसवालला स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर सारख्या खेळाडूंसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. तर देवदत्त पडिक्कलला विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससोबत फलंदाजी करण्याची संधी मिळते. वाचा- पंजाबकडून खेळणाऱ्या एम अश्विन आणि रवि बिश्नोईला अनिल कुंबळेचे मार्गदर्शन मिळते. तर मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंना महेला जयवर्धने कडून दबाव असताना शांत कसे रहायचे हे शिकता येते. आयपीएल क्रिकेटमधील मोठे महाविद्यालय असल्याचे गावस्कर म्हणाले. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/380JEBK
No comments:
Post a Comment