अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने १ बाद २४ धावा केल्या असून इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्याने भारत अद्याप १८१ धावांनी पिछाडीवर आहे. पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला असला तरी या खेळात एक राडा देखील पाहायला मिळाला. वाचा- इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना कर्णधार आणि हे एकमेकांना भिडले. सामन्यातील १३व्या षटकात मोहम्मद सिराजने जो रूटला बाद केले. त्यानंतर बेन स्टोक्स खेळण्यास आला. ओव्हर संपल्यानंतर स्टोक्सने सिराजकडे पाहून काही तरी बोलला. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेकनंतर कोहली आणि स्टोक्स यांच्यात शाब्दीक चकमक झाली. वाचा- वाचा- या दोन्ही खेळाडूंच्यात बराच वेळ वाद सुरू होता. अखेर मैदानावरील अंपायर विरेंद्र शर्मा आणि नितीन मेनन यांना मध्ये पडावे लागले. हे प्रकरण शांत झाल्यानंतर देखील पुढील ओव्हरमध्ये स्टोक्सने सिराजला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. वाचा- विराट आणि स्टोक्स यांच्यात वाद होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी तिसऱ्या कसोटीत देखील या दोघांच्यात वाद झाला होता. तेव्हा स्टोक्स फलंदाजी करत होत आणि गोलंदाज आर अश्विन होता. अश्विन गोलंदाजी करण्यास येताच स्टोक्सने त्याला थांबवले. स्टोक्सचा प्रयत्न अश्विनची एकाग्रता भंग करण्याचा होता. तेव्हा विराटने त्याला वेळ वाया घालवू नको असे बजावले. २०१६ साली देखील या दोघांमध्ये असे वाद झाले होते. तेव्हा आयसीसीने स्टोक्सला डिमेरिट गुण दिले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OqVQ7q
No comments:
Post a Comment