नवी दिल्ली: एकाच सामन्यात हॅटट्रिक सारखी शानदार कामगिरी केल्यानंतर त्यानंतर एका ओव्हरमध्ये सहा खाण्याचा अनोखी पण नको वाटणारी कामगिरी श्रीलंकेचा फिरकीपटू अकीला धनंजयच्या नावावर नोंद झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याने हॅटट्रिक घेतली आणि त्याच सामन्यात कायरन पोलार्डने एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारले. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये अशी कामगिरी करणारा तो फक्त तिसरा फलंदाज आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या आणि भारताच्या यांनी ही कामगिरी केली. पोलार्डच्या या धमाकेदार कामगिरीनंतर जाणून घेऊयात याआधीच्या फलंदाजांसाठीच्या परफेक्ट ओव्हर... वाचा- हर्षल गिब्स (२००७-वर्ल्ड कप)- १६ मार्च २००७ रोजी आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. त्याने नेदरलँडविरुद्ध ही कामगिरी केली होती. त्याने फिरकीटपटूला सह षटकार मारले होते. त्या सामन्यात गिब्सने ४० चेंडूत ७२ धावा केल्या, तर आफ्रिकेने हा सामना २२१ धावांनी जिंकला. वाचा- युवराज सिंग (२००७- टी-२० वर्ल्डकप)- पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये १९ सप्टेंबर २००७ रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अॅड्यू फिंटऑफसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर संतापलेल्या युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारणारा तो पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव खेळाडू आहे. या सामन्यात त्याने १२ चेंडूत ५० धावा केल्या आणि भारताने सामना १८ धावांनी जिंकला. वाचा- (२०२१- श्रीलंकेविरुद्ध टी-२०)- लंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात विजयासाठी १३२ धावांचा पाठला करताना वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डने हॅटट्रिक करणाऱ्या धनंजयला एकाच षटकात सहा षटकार मारले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका खास यादीत नाव नोंदवले. त्याने ११ चेंडूत ३८ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट ३४५.४५ इतका होता. वेस्ट इंडिजने हा सामना ४ विकेटनी जिंकला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uQs3Wi
No comments:
Post a Comment